मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Omicron मुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा झटका! GDP ग्रोथमध्ये घट होण्याचा अंदाज

Omicron मुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा झटका! GDP ग्रोथमध्ये घट होण्याचा अंदाज

ओमिक्रॉनच्या वाढत्या संक्रमणादरम्यान चालू आर्थिक वर्ष 2021-2022 मध्ये, भारताच्या आर्थिक वाढीचा अंदाज देशांतर्गत रेटिंग एजन्सी इंडिया रेटिंग्स अँड रिसर्चने घटवला आहे.

  • Published by:  Janhavi Bhatkar

नवी दिल्ली, 07 जानेवारी: गेल्यावर्षीच्या शेवटच्या काही महिन्यात कोरोनाचे (Coronavirus Latest Update) संक्रमण कमी झालं होतं, असं म्हणत सुटकेच्या निश्वास भारतीय टाकतच होतेच तेवढ्यात Omicron येऊन धडकला आहे. भारतासह जगभरात ओमिक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा प्रसार (coronavirus new variant latest news) होत आहे. या दरम्यानच चालू आर्थिक वर्ष 2021-2022 मध्ये, भारताच्या आर्थिक वाढीचा अंदाज देशांतर्गत रेटिंग एजन्सी इंडिया रेटिंग्स अँड रिसर्चने घटवला आहे. एजन्सीने म्हटले आहे की गेल्या 15 दिवसात नवीन प्रकरणांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे, चौथ्या तिमाहीत विकास दर 5.7 टक्क्यांपर्यंत खाली येऊ शकतो, यापूर्वी वाढीचा अंदाज 6.1 टक्के होता.

एजन्सीच्या म्हणण्यानुसार, कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमुळे लादलेल्या निर्बंधांचा (lockdown news) आर्थिक सुधारणांवर वाईट परिणाम होईल. निर्बंधांचा परिणाम थेट अर्थव्यवस्थेवर होणार आहे. एजन्सीच्या अहवालानुसार ओमिक्रॉनमुळे जानेवारी-मार्च तिमाहीच्या जीडीपीवर 0.4 टक्के प्रभाव दिसून येईल. तर संपूर्ण वर्षासाठी जीडीपी आधीच्या अंदाजांच्या तुलनेत 0.1 टक्क्यांनी कमी होऊ शकतो.

हे वाचा-Gold Price: सोन्याचांदीचे लेटेस्ट दर जारी, काय किमतीने खरेदी करता येईल गोल्ड

चौथ्या तिमाहीत हॉटेल इंडस्ट्रीची मागणी होईल कमी- ICRA रिपोर्ट

दरम्यान रेटिंग एजन्सी ICRA च्या मते, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेदरम्यान चालू आर्थिक वर्षाच्या जानेवारी ते मार्च या तिमाहीत हॉटेल इंडस्ट्रीतील मागणी कमी होईल. एजन्सीने एका निवेदनात म्हटले आहे की, गेल्या एका आठवड्यात कोरोना संक्रमणात झपाट्याने झालेली वाढ आणि अनेक राज्यात लागू करण्यात आलेला अंशत: लॉकडाऊन यामुळे जानेवारी 2022 मध्ये झालेली हॉटेल बुकिंग रद्द करण्यात आली आहेत. शिवाय पुढील काही आठवड्यांसाठी हॉटेल बुकिंग मंद गतीने होत आहे.

हे वाचा-दररोज केवळ 200 रुपये वाचवून बनवा 28 लाखांचा फंड, वाचा सविस्तर

रेटिंग एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या महिनाअखेरपर्यंत केवळ निवडक व्यावसायिक प्रवासात कपात करण्यात आली होती, डिसेंबरमध्ये सुट्टीच्या प्रवासावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला नाही आणि बुकिंगवर कोणताही मोठा परिणाम दिसून आला नव्हता.

First published:

Tags: Corona, Corona spread, Corona virus in india, Coronavirus, Coronavirus cases, Gdp, Money