JOIN US
मराठी बातम्या / कोरोना / ओमिक्रॉन वेगाने पसरत असतानाही तज्ज्ञांना काळजी नाही! जाणून घ्या काय आहे कारण

ओमिक्रॉन वेगाने पसरत असतानाही तज्ज्ञांना काळजी नाही! जाणून घ्या काय आहे कारण

Coronavirus Cases in America : भारतासह जगभरात कोरोना विषाणूचा नवीन प्रकार ओमिक्रॉन संसर्ग वेगाने पसरत आहे. अशा परिस्थितीत अमेरिकेतून मात्र चांगली बातमी आली आहे.

जाहिरात

omicron

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

वॉशिंग्टन, 6 जानेवारी : जगभरात झपाट्याने पसरत असलेला कोरोना विषाणूचा नवीन प्रकार ओमिक्रॉनला (Omicron) रोखण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत. रुग्णालये सज्ज झाली असून अनेक देशांमध्ये टाळेबंदीची घोषणा करण्यात आली आहे. अशात कोरोनाच्या वाईट परिस्थितीचा सामना करणाऱ्या अमेरिकेतून (Covid-19 in America) एक चांगली बातमी येत आहे. यूएस रुग्णालयातील तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की ओमिक्रॉनमध्ये मागील लहरींच्या तुलनेत कमी लोकांना आयसीयूमध्ये दाखल करावं लागत आहे. विशेषत: ज्या भागात लोकांचे लसीकरण झालं आहे. ओमिक्रॉनमध्ये (Omicron) सौम्य लक्षणे असलेले रुग्णांची संख्या जास्त असल्याचे दिसून आले आहे. अशा परिस्थितीत आरोग्य विभाग संरक्षणात्मक उपायांवर अधिक भर देत आहे, ज्यामध्ये चांगल्या दर्जाचे मास्क घालण्यावर तसेच लस बूस्टर वापरण्यावर भर दिला जात आहे. हार्वर्ड मेडिकल स्कूलचे म्हणणे आहे की हा हिवाळा कठीण असेल, त्यामुळे लोकांना विनंती आहे की त्यांनी स्वतःचे संरक्षण करावे आणि समाजाचे भले करावे. अमेरिकेत फेब्रुवारीमध्ये रुग्णालयांची गरज भासू शकते अनेक देशांनी लवकर ओमिक्रॉनला रोखण्यात यश मिळवलं आहे. मात्र, अमेरिकेबद्दल आत्ताच असे म्हणता येणार नाही. वॉशिंग्टन विद्यापीठातील इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ मेट्रिक्स अँड इव्हॅल्युएशनचा अंदाज आहे की फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत राष्ट्रीय स्तरावर रुग्णालयांची गरज भासू शकते. मोठी बातमी: Omicron मुळे उदयास येणार नवा व्हेरिएंट? त्याचप्रमाणे, लॉस एंजेलिसमधील सेडर्स सिनाई यांनाही विश्वास आहे की फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत रुग्णालयांमध्ये रुग्णांची संख्या वाढू शकते. टेक्सासमधील ह्यूस्टन मेथोडिस्ट हॉस्पिटलनेही महिन्याच्या अखेरीस कोरोना रुग्णसंख्येचा पीक येईल असा अंदाज व्यक्त केला आहे. पण त्यांना आरोग्य कर्मचाऱ्यांची जास्त काळजी आहे. ओमिक्रॉनच्या (Omicron) लाटेत 28000 कर्मचाऱ्यांपैकी 10 टक्के पॉझिटिव्ह आढळले होते. मुंबई लोकल बंद होणार? जिल्हाबंदी होणार की lockdown? आरोग्यमंत्र्यांनी म्हटलं… अनेक हॉस्पिटलिस्ट मानतात की बहुसंख्या कोविड रुग्णांना इतर कारणांमुळे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. सौम्य लक्षणे असलेल्या ओमिक्रॉनच्या संक्रमित रूग्णांमुळे हॉस्पिटलवर दबाव वाढतो. यापैकी बहुतेक प्रकरणे ही उपचार न घेताच ठीक होऊ शकतात. मात्र, रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले नाही तरी, एक दबाव असतोच.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या