जाहिरात
मराठी बातम्या / देश / Omicron मुळे नवा व्हेरिएंट येणार उदयास?, असेल धोकादायक; WHO नं दिला इशारा

Omicron मुळे नवा व्हेरिएंट येणार उदयास?, असेल धोकादायक; WHO नं दिला इशारा

ओमायक्रॉन वेगानं जगभर पसरत आहे. जेव्हा हा व्हेरिएंट सुरुवातीला समोर आला तेव्हा त्याच्या संसर्गाच्या तीव्रतेबद्दल अनेक तर्क वर्तवले जात होते.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 06 जानेवारी: ओमायक्रॉनचा (Omicron) धोका जगभरात कायम आहे. अशा परिस्थितीत, जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) कोरोना व्हायरसच्या विद्यमान व्हेरिएंटपेक्षा नवीन आणि अधिक धोकादायक व्हेरिएंटबद्दल इशारा दिला आहे. ओमायक्रॉन वेगानं जगभर पसरत आहे. जेव्हा हा व्हेरिएंट सुरुवातीला समोर आला तेव्हा त्याच्या संसर्गाच्या तीव्रतेबद्दल अनेक तर्क वर्तवले जात होते. पण आता त्याचे संक्रमण अतिशय सौम्य असल्याचे दिसून येत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव लवकरच संपुष्टात येईल आणि पूर्वीप्रमाणे जनजीवन सुरळीत होईल, अशा बाबी समोर येऊ लागल्या आहेत. ‘ओमायक्रॉनचा वाढता संसर्ग हा मोठा धोका’ मात्र WHO नं म्हटलं आहे की, इतक्या लवकर सर्वकाही ठिक होणार नाही. मात्र परिस्थिती आणखी बिघडू शकते. डब्ल्यूएचओच्या वरिष्ठ आपत्कालीन अधिकारी कॅथरीन स्मॉलवुड यांनी एएफपी या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, ओमायक्रॉन संसर्गाच्या वाढत्या दराचा विपरीत परिणाम होऊ शकतो. हेही वाचा-   Mumbai Corona Update: खासगी रुग्णालयांसाठी नव्या गाईडलाइन्स,  BMC चा मोठा निर्णय ते म्हणाले, ओमायक्रॉन जितका जास्त पसरतो, जितक्या वेळा व्हायरस त्याचे स्वरूप बदलतो, तितकीच नवीन व्हेरिएंट उदयास येण्याची शक्यता असते. ओमायक्रॉन डेल्टा व्हेरिएंटपेक्षा कमी प्राणघातक असू शकते, परिणामी मृत्यू दर कमी होतो. पण नवीन व्हेरिएंट किती धोकादायक असेल कुणास ठाऊक.. काही सांगता येत नाही. परिस्थिती अतिशय धोकादायक WHO च्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, महामारी सुरू झाल्यापासून युरोपमध्ये 10 कोटीहून अधिक कोविड प्रकरणे नोंदवली गेली आहेत आणि 2021 च्या शेवटच्या आठवड्यात 50 लाखांहून अधिक नवीन प्रकरणे नोंदवली गेली आहेत. कॅथरीन स्मॉलवुड म्हणतात की, ही परिस्थिती खूप धोकादायक आहे. आपण अत्यंत धोकादायक परिस्थितीत आहोत. आम्ही पाहिले की पश्चिम युरोपमध्ये संसर्गाचे प्रमाण खूप जास्त आहे. आणि त्याचा पूर्ण परिणाम काय होईल, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. कॅथरीन स्मॉलवूड म्हणतात की, ओमायक्रॉन संसर्गामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याचे प्रमाण कमी असले तरी ते ज्या वेगाने पसरत आहे त्यामुळे जास्त धोका निर्माण होऊ शकतो. ते म्हणाले, ओमायक्रॉनची प्रकरणे इतकी वाढली आहेत की त्यामुळे अनेकांना गंभीर संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे रुग्णालयांमध्ये रुग्णांची संख्या वाढणार असून मृतांचा आकडाही वाढू शकतो. हेही वाचा-   Covid Task Force च्या डॉक्टरांचा गंभीर इशारा! मुंबईत आज 20 हजारहून अधिक रुग्ण पॉझिटिव्ह येण्याची शक्यता

 ओमायक्रॉनच्या वाढत्या प्रकरणांमुळे युरोपमध्ये चिंतेचे वातावरण आहे. ब्रिटनमध्ये मंगळवारी ओमायक्रॉन संसर्गाच्या लाटेमुळे रुग्णालयात कर्मचार्‍यांची कमतरता निर्माण झाली. कारण ब्रिटनमध्ये प्रथमच एकाच दिवसात कोविडचे 2 लाख नवीन रुग्ण आढळले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात