मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

कोरोनाचं थैमान; मुंबई लोकल बंद होणार? जिल्हाबंदी होणार की lockdown लागणार? आरोग्यमंत्र्यांनी दिली सर्वच प्रश्नांची उत्तरे

कोरोनाचं थैमान; मुंबई लोकल बंद होणार? जिल्हाबंदी होणार की lockdown लागणार? आरोग्यमंत्र्यांनी दिली सर्वच प्रश्नांची उत्तरे

Maharashtra coronavirus news updates: राज्यात कोरोना बाधितांच्या संख्येत होणारी वाढ निश्चितच चिंता वाढवणारी आहे. त्यामुळे आता राज्यात कठोर निर्बंध लावण्यात येणार असल्याची जोरदार चर्चा आहे.

Maharashtra coronavirus news updates: राज्यात कोरोना बाधितांच्या संख्येत होणारी वाढ निश्चितच चिंता वाढवणारी आहे. त्यामुळे आता राज्यात कठोर निर्बंध लावण्यात येणार असल्याची जोरदार चर्चा आहे.

Maharashtra coronavirus news updates: राज्यात कोरोना बाधितांच्या संख्येत होणारी वाढ निश्चितच चिंता वाढवणारी आहे. त्यामुळे आता राज्यात कठोर निर्बंध लावण्यात येणार असल्याची जोरदार चर्चा आहे.

मुंबई, 6 जानेवारी : राज्यातील कोरोनाची (Coronavirus) रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. याच संदर्भात राष्ट्रवादी काँग्रसे पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी कोरोना परिस्थितीचा आढावा घेणारी एक बैठक घेतली. या बैठकीत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Toep), आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत काय चर्चा झाली आणि राज्यात कठोर निर्बंध, वीकेंड लॉकडाऊन (Weekend lockdown) किंवा लोकल (Mumbai Local Train) बंद करण्याच्या संदर्भात काय ठरलं? यावर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, राज्यात कोरोना बाधितांची वाढती रुग्णसंख्या पाहता शरद पवारांनी बैठकीत चर्चा केली. काय उपाययोजना सुरू आहेत आणि नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी काही आवश्यकता आहे का? निर्बंध लावण्याची गरज आहे का? यावर चर्चा झाली. शाळा-कॉलेजेस बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. पण विद्यार्थी, नागरिकांनी उगाच विनाकारण बाहेर फिरायला नको अशा संदर्भातीलही आरोग्य अधिकाऱ्यांनी म्हटलं. काही जण विनाकारण रस्त्यावर फिरत असतात. मग शाळा बंद करून अर्थ काय असे आरोग्य विभागाकडून सांगतले. शरद पवारांनी आधी समजून घेतलं आरोग्य विभागाकडून काही सूचना मागवून घेतल्या आहेत. जर निर्बंध वाढवण्याची आवश्यकता असेल तर ती करावी अशी सूचना केली.

वाचा : राज्यात कोरोनाचं थैमान, Lockdown संदर्भात वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी केलं महत्त्वाचं विधान

लोकल ट्रेन बंद होणार?

कोरोनाची वाढती आकडेवारी रोखण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कौटुंबिक कार्यक्रमांवर कडक नियमांची अंमलबजावणी व्हायला हवी. लसीकरण वाढवलं पाहिजे. लसीकरण वाढवले पाहिजे यावर एकमत झाले. 80 टक्के बेड रिकामे आहे बेडची उपलब्धता आहे आँक्सिजनही पुरेसा आहे. मुंबई लोकल बंद करण्याच्या संदर्भात कुठलाही निर्णय नाहीये असंही आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं.

नाईट कर्प्यू किंवा वीकेंड लॉकडाऊन?

आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, राज्यात नाईट कर्फ्यू किंवा वीकेंड लॉकडाऊन लावण्याच्या संदर्भात कुठलाही निर्णय अद्याप झालेला नाहीये. वीकेंड लॉकडाऊन किंवा नाईट कर्फ्यू संदर्भात केवळ चर्चा झाली मात्र निर्णय कुठलाही झालेला नाहीये. या संदर्भातील निर्णय हा मुख्यमंत्री घेतात. तसेच राज्यात जिल्हा बंधी लावण्याचा कुठलाही निर्णय झालेला नाहीये.

वाचा : खासगी रुग्णालयांसाठी नव्या गाईडलाइन्स, BMC चा मोठा निर्णय

मुंबईत कोरोनाचा उद्रेक

मुंबईत कोरोनाचं प्रचंड थैमान सुरु आहे. विशेष म्हणजे कोरोनाच्या नव्या रुग्णसंख्येने तर बुधवारी (5 जानेवारी) पहिल्या आणि दुसऱ्या कोरोनाच्या लाटेचाही रेकॉर्ड मोडला आहे. मुंबईत दिवसभरात तब्बल 15 हजारांपेक्षाही जास्त नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. विशेष म्हणजे चाचणी करणाऱ्या प्रत्येक तीन जणांनंतर चौथी व्यक्ती कोरोनाबाधित आढळत आहे. त्यामुळे कोरोनाचा पॉझिटिव्ही रेट हा थेट 25 टक्क्यांवर पोहोचला आहे. मुंबईत गेल्या 24 तासात तब्बल 15 हजार 166 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. कोरोनाबाधितांचा हा वाढता आकडा प्रचंड चिंता वाढवणारा आहे.

First published:

Tags: Coronavirus, Mumbai local, Rajesh tope