प्रातिनिधिक फोटो
नवी दिल्ली 16 नोव्हेंबर : जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मुख्य शास्त्रज्ञ सौम्या स्वामीनाथन (Dr Saumya Swaminathan) यांनी सोमवारी सांगितले की, अपेक्षेप्रमाणे कोरोनाची प्रकरणे (Corona Cases) वाढली आहेत परंतु मृतांची संख्या कमी झाली आहे. CNBC-TV18 शी केलेल्या संभाषणात स्वामीनाथन म्हणाल्या की, कमी प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांवर लसीकरणाचा (Corona Vaccination) परिणाम जगभरात दिसू लागला आहे. अनेक पाश्चिमात्य देशांमध्ये संसर्गाची प्रकरणे वाढत आहेत, त्यापैकी काहींना रुग्णालयात दाखल करावे लागले आहे परंतु मृतांची संख्या कमी झाली आहे, असंही त्यांनी सांगितलं. एकच नंबर! Corona Vaccination मध्ये मुंबई पालिकेनं गाठला विक्रम स्वामीनाथन म्हणाल्या की प्रौढांसाठी, दोन डोसची लस एक वर्ष किंवा त्याहून अधिक काळ प्रभावी आहे. असे अनेक पुरावे समोर येत आहेत जे दर्शवितात की लसीमुळे निर्माण होणारी प्रतिकारशक्ती दीर्घकाळ टिकू शकते. व्हॅक्सिन मिक्सिंगबद्दलच्या प्रश्नावर त्या म्हणाल्या की ही एक रंजक संकल्पना आहे परंतु त्यावर अधिक डेटा आवश्यक आहे. दुसरीकडे बूस्टर डोसबाबत त्या म्हणाल्या की, त्याची गरज आहे की नाही हे पाहावे लागेल. यासोबतच लोकांना कोणत्या बूस्टर डोसची गरज आहे याकडेही लक्ष द्यावे लागेल. WHO ने कोव्हॅक्सिनला मंजुरी दिल्यानंतर दोन आठवड्यांनंतर, मुख्य शास्त्रज्ञांनी संस्थेच्या प्रक्रियेचा बचाव केला आहे. त्या म्हणाल्या , स्वतंत्र वैज्ञानिक आणि तांत्रिक प्रक्रियेचा आदर केला पाहिजे. कोरोनामुळे चव गेली ती परत आलीच नाही, सडक्या अंड्यासारखी लागते चव लसीच्या मंजुरीला झालेल्या विलंबावर WHO च्या आरोग्य आपत्कालीन कार्यक्रमाचे कार्यकारी संचालक डॉ. माइक रायन यांनी यापूर्वी सांगितले की, लसीच्या वापरास परवानगी देण्याचा निर्णय घेण्यासाठी लसीचे पूर्ण मूल्यांकन आणि शिफारस करण्याची प्रक्रिया सुरू होती. काहीवेळा यासाठी अधिक वेळ लागतो आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जगाला योग्य सल्ला देणे महत्त्वाचे आहे.