मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

कोरोनामुळे चव गेली ती परत आलीच नाही, सडक्या अंड्यासारखी लागते चव

कोरोनामुळे चव गेली ती परत आलीच नाही, सडक्या अंड्यासारखी लागते चव

कोरोना झाल्यावर गेलेली (11 year old loosed taste in Corona which never returns to normal) तोंडाची चव परत आलीच नसल्याचा अनुभव एका 11 वर्षांच्या मुलाला सध्या येत आहे.

कोरोना झाल्यावर गेलेली (11 year old loosed taste in Corona which never returns to normal) तोंडाची चव परत आलीच नसल्याचा अनुभव एका 11 वर्षांच्या मुलाला सध्या येत आहे.

कोरोना झाल्यावर गेलेली (11 year old loosed taste in Corona which never returns to normal) तोंडाची चव परत आलीच नसल्याचा अनुभव एका 11 वर्षांच्या मुलाला सध्या येत आहे.

    लंडन, 13 नोव्हेंबर: कोरोना झाल्यावर गेलेली (11 year old loosed taste in Corona which never returns to normal) तोंडाची चव परत आलीच नसल्याचा अनुभव एका 11 वर्षांच्या मुलाला सध्या येत आहे. कोरोनाची लागण झाल्यानंतर चव जाणे आणि वास जाणे ही लक्षणं (Loss of taste and smell) अनेकांना जाणवतात. मात्र काही दिवसांनी पुन्हा चव आणि वास परत येतात. एका तरुणाला मात्र चवीच्या बाबतीत भीषण अनुभव आला असून कोरोना काळात गेलेली त्याची चव परतच आलेली नाही. कोरोना होऊन दोन महिने झाले तरी त्याच्या तोंडाची चव परत येत नाही. एवढंच नव्हे, तर त्याला प्रत्येक गोष्ट ही गटाराच्या पाण्यासारखी, सडक्या अंड्यांसारखी आणि मानवी विष्ठेसारखी वाटत असल्याचं दिसून आलं आहे. अजब लक्षणं ब्रिटनमध्ये राहणाऱ्या ओल्ड स्वान या 11 वर्षांच्या मुलाला सप्टेंबर महिन्यात कोरोना झाला होता. त्याला कोरोनाची कुठलीही गंभीर लक्षणं दिसत नव्हती. मात्र या काळात त्याचा चव गेली होती. चव जाणं हे सामान्य लक्षण असल्यामुळे आठ दिवसांत ती परत येईल, असा सर्वांचा अंदाज होता. मात्र दोन आठवडे उलटूनही त्याची चव परत येईना. कितीही तिखट, आंबट किंवा खारट पदार्थ त्याला खाऊ घातले, तरी त्याची कुठलीच चव त्याला लागेना. येते दुर्गंधी काही दिवसांनी तर ही लक्षणं अधिकच बळावली. त्याला खात असलेली प्रत्येक गोष्ट ही सडक्या अंड्यासारखी, गटाराच्या पाण्यासारखी किंवा मानवी विष्ठेसारखी आहे, असं वाटू लागलं. त्यामुळं अन्नावरची त्याची वासनाच उडाली. अन्न पाहिलं तरी त्याला उलटी येऊ लागली. जेव्हा जेव्हा तो काहीही खायचा, तेव्हा तेव्हा त्याला उलटी व्हायची. हे वाचा- Corona Virus चा असाही दुष्परिणाम, जमा झाला 80 लाख टन प्लास्टिक कचरा वजन झालं कमी या काळात मुलाचं वजन 2 किलोंनी घटलं. या मुलाला सध्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत. त्याची चव लवकरच परत येईल, असा विश्वास डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. चव जाणं ही गंभीर बाब नसून तो अन्न खात नाही, ही अधिक गंभीर बाब असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. या तरुणाच्या विचित्र आजारावर सध्या डॉक्टर संशोधन करत असून त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Britain, Corona, Health

    पुढील बातम्या