जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / Corona Vaccination मध्ये मुंबई पालिकेनं गाठला विक्रम, 100 टक्के नागरिकांचा पहिला डोस पूर्ण

Corona Vaccination मध्ये मुंबई पालिकेनं गाठला विक्रम, 100 टक्के नागरिकांचा पहिला डोस पूर्ण

Corona Vaccination मध्ये मुंबई पालिकेनं गाठला विक्रम, 100 टक्के नागरिकांचा पहिला डोस पूर्ण

मुंबई पालिकेनं (Mumbai Municipal Corporation) कोरोना लसीकरणात (Corona Vaccination) एक नवा विक्रम गाठला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 14 नोव्हेंबर: मुंबई पालिकेनं (Mumbai Municipal Corporation) कोरोना लसीकरणात (Corona Vaccination) एक नवा विक्रम गाठला आहे. शनिवारी पालिकेनं (BMC) कोरोना लसीकरणाच्या मोहिमेत 18 वर्षांवरील सर्व पात्र 92 लाख 36 हजार नागरिकांना पहिला डोस देण्याचं उद्दिष्ट पालिकेनं सकाळच्या पहिल्याच सत्रात पूर्ण केलं. मुंबईतल्या सर्व शासकीय, महानगरपालिका आणि खासगी लसीकरण केंद्रांवरील कामगिरीचा यात समावेश आहे. या रेकॉर्डमुळे मुंबई पालिकेनं देशातल्या दिल्ली, चेन्नई आणि बंगळुरुसह सर्व महापालिकांमध्ये सर्वोत्तम ठरण्याचा मान मिळवला आहे. हेही वाचा-  मुलाच्या वाढदिवशी घरी येण्याचं वचन, पण अतिरेकी हल्ल्यात निधन; शहीद जवानाची मनाला चटका लावणारी एक्झिट मुंबई पालिका क्षेत्रात जवळपास 92 लाख 36 हजार 500 पात्र नागरिकांचे कोविड लसीकरण उद्दिष्ट्य आहे. यापैकी शनिवारी दुपारी 12 वाजेपर्यंत 92 लाख 39 हजार 902 नागरिकांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला. याची नोंद कोविन या राष्ट्रीय लसीकरण संकेत स्थळावर झाली आहे. या लसीकरणामुळे पहिल्या डोसचं उद्दिष्ट 100 टक्के पूर्ण झालं आहे. दुसरीकडे कोरोना लसीचा दुसरा डोस पूर्ण करण्यासाठी पालिका सध्या वेगानं काम करत आहे. मुंबई पालिका क्षेत्रात 60 लाख लोकांनी कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला आहे. शनिवारी दुपारी 12 वाजेपर्यंत जवळपास 59 लाख 83 हजार 452 नागरिकांनी दुसरा डोस घेतल्याची नोंद झाली आहे. हेही वाचा- टीम इंडियासाठी द्रविड-लक्ष्मण एकत्र, गांगुलीनं पुन्हा जमवली Very Very Special जोडी मुंबई पालिका सध्या लाभार्थ्यांना कोरोना लसीचा दुसरा डोस घ्यावा यासाठी देखील आवाहन करत आहे. नवी मुंबईत 18 वर्षावरील सर्व नागरिकांच्या लसीकरणाचा पहिला डोस पूर्ण गेल्या महिन्यात नवी मुंबईमध्ये सर्व 18 वर्षा वरील नागरिकांचा कोरोना विरोधी प्रतिबंधक लसीकरणाचा पहिला डोस पूर्ण झाला. 100 टक्के नागरिकांचा पहिला डोस पूर्ण करणारं नवी मुंबई हे पहिलं शहर ठरलं. सुमारे 11 लाख नागरिकांना कोविड प्रतिबंधक लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात