JOIN US
मराठी बातम्या / राशीभविष्य / आज बुध करणार सिंह राशीत प्रवेश; 5 राशी ठरणार Lucky

आज बुध करणार सिंह राशीत प्रवेश; 5 राशी ठरणार Lucky

ज्योतिष शास्त्रानुसार (According to Astrology) ऑगस्ट लाभदायक आहे. नोकरी,व्यापाराता फायदा होईल, कोंटुंबिक सुख मिळेल.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

दिल्ली, 09 ऑगस्ट :  ज्योतिष शास्त्रानुसार (According to Astrology) ग्रहांचे स्थान बदलण्याचा राशींवर  (Zodiac Sing)  परिणाम होत असतो. ऑगस्ट (August) महिन्यामध्ये काही ग्रह आपलं स्थान बदलणार आहेत. हे ग्रह दुसऱ्या राशींमध्ये स्थानापन्न झाल्यामुळे सगळ्याच राशींवर परिणाम (Effect) होणार आहे. 9 ऑगस्टला बुद्ध ग्रह सिंह राशीमध्ये या राशीचा स्वामी सुर्य आहे. सूर्य 17 ऑगस्टला सिंह राशीमध्ये प्रवेश करेल. तेव्हा ‘बुधादित्य’ योग निर्माण होणार आहे. या राशी मध्ये बुध आणि सूर्याची युती झाल्यामुळे शुभयोग होणार आहेत. पाहुयात 12 राशींवर याचा काय परिणाम होणार आहे. आज म्हणजेच 9 ऑगस्टला बुध ग्रहाचा सिंह राशीमध्ये प्रवेश होणार आहे. या राशीमध्ये सूर्य या आधीपासूनच विराजमान आहे तर, बुध ग्रह 26 ऑगस्टपर्यंत या राशीमध्ये राहून नंतर कन्या राशीत प्रवेश करणार आहे. मेष रास मेष राशीच्या लोकांचा उत्साह वाढणार आहे. स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. उच्च पदावर विराजमान होण्याची संधी आहे. गैरसमजाने नातलगांशी वाद-विवाद होऊ शकतात. ( चटपटीत लोणचं जिभेसाठी चांगलं पण, पोटाचं काय? अ‍ॅसिडिटी, कोलेस्ट्रॉलचा होईल त्रास ) वृषभ रास वृषभ राशीच्या लोकांच्या बोलण्यामध्ये सकारात्मकता येणार आहे. कौटुंबिक वातावरण चांगलं राहील. नातेसंबंध सुधारतील, सगळ्या आघाड्यांवर उत्तम परिणाम दिसेल. ( साप्ताहिक राशीभविष्य : कसा जाणार तुमचा श्रावणाचा पहिला आठवडा? ) मिथुन रास या राशीचे लोक आपल्या तब्येतीची काळजी घेतील. प्रवासाचे योग तयार होत आहेत. नवीन ओळखी होऊन मित्रपरिवार वाढेल. कौटुंबिक संबंध सुधारतील. साहित्य क्षेत्रामध्ये यश मिळेल. कर्क रास कर्क राशीच्या लोकांचे खर्च वाढतील. आरोग्यासंबंधी काही समस्या निर्माण होऊ शकतात. विद्यार्थ्यांना हा काळ अनुकूल आहे. नातेसंबंधांमध्ये प्रेम निर्माण होईल. ( Monsoon Wedding: लग्न करताना लक्षात ठेवा 5 Tips; सुंदर होईल अविस्मरणीय क्षण ) सिंह रास सिंह राशीच्या लोकांसाठी काळ चांगला आहे. संपत्ती, शौर्य वाढेल. रिस्क घेण्याची तयारी ठेवावी. चांगल्या लोकांच्या गाठीभेटी होऊन संबंध सुधारतील. जास्त विचार करु नये. आजारपण येण्याची शक्यता असल्याने स्वतःची काळजी घ्या. इन्व्हेस्टमेंटच्या संधी मिळतील. ( अशा प्रकारे कांद्याची पारख करायला शिका! कांदे खराब होण्याचं टेन्शन विसरा ) कन्या रास व्यापारासाठी हा काळ उत्तम आहे. आवक वाढेल मात्र, अनावश्यक खर्च टाळावेत. प्रवासाच्या संधी मिळतील. तब्येतीची काळजी घ्यावी. आहाराकडे लक्ष देऊन व्यायाम देखील करावा. तुळ रास तूळ राशीसाठी हा काळ लाभदायक आहे. भाग्याची साथ मिळेल. आर्थिक उलाढालीमध्ये फायदा होईल. नवीन ओळखी होतील. बेकायदेशीर कामांमध्ये अडकू नका. ( Parenting Tips: लगेच टेन्शन घेऊ नका! बाळाला शिंका येण्याची ‘ही’ आहेत कारणं ) वृश्चिक रास वृश्चिक राशीसाठी बदलाची चांगली संधी आहे. मित्र परिवाराकडून मदत मिळेल. संपत्तीची काळजी घ्यावी. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. या काळामध्ये इन्व्हेस्टमेंट करणं टाळा. धनु रास धनु राशीच्या लोकांना सहकाऱ्यांची मदत मिळेल. त्यामुळे जबाबदार्‍या वेळेत पूर्ण करू शकाल. धनलाभाची संधी आहे. इन्व्हेस्टमेन्ट करण्याची शक्यता आहे. या काळात उत्साही आणि आनंदी वातावरण राहील. ( खराब म्हणून फेकून देऊ नका! मोबाईल चार्जिंग केबलचा करू शकता असा वापर ) मकर रास कार्यक्षेत्रामध्ये नवीन संधी मिळाल्यामुळे मेहनत जास्त करावी लागेल. हा काळ भाग्यकारक आहे. विद्यार्थ्यांसाठी अनुकूल काळ मानला जातोय. कुंभ रास कुंभ राशीसाठी हा काळ अनुकूल आहे. कौटुंबिक सुख लाभेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात गती मिळेल. बेकायदेशीर कामांपासून दूर राहावं. व्यापारासाठी हा काळ फायदेशीर आहे. ( IIT ते UPSC सोपा नव्हता प्रवास; गाव खेड्यातल्या खुशबू गुप्तांनी कसं मिळवलं यश? ) मीन रास कुटुंबात गैरसमजामधून वाद विवाद संभवतात. कार्यक्षेत्रामध्ये विरोधकांपासून सांभाळून राहा. प्रॉपर्टीचे निर्णय पुढे ढकला. विद्यार्थ्यांना यश मिळेल. नोकरीमध्ये पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. (Disclaimer: या लेखामधली तपशील आणि सूचना सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. news18lokmat.com त्याची पुष्टी करत नाही. याला शास्त्रीय आधार नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या