• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • चटपटीत लोणचं जिभेसाठी चांगलं पण, पोटाचं काय? अ‍ॅसिडिटी, कोलेस्ट्रॉलचा होईल त्रास

चटपटीत लोणचं जिभेसाठी चांगलं पण, पोटाचं काय? अ‍ॅसिडिटी, कोलेस्ट्रॉलचा होईल त्रास

लोणचं अतिखाण्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढण्याचा धोका असतो.

लोणचं अतिखाण्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढण्याचा धोका असतो.

काही लोकांना लोणचं इतकी आवडं की त्यांना लोणच्याशिवाय जेवणाची चवही लागत नाही. पण, सतत लोणचं खाण्याने आरोग्यावर घातक परिणाम होतात?

 • Share this:
  नवी दिल्ली, 08 ऑगस्ट : जेवणाच्या ताटात ऐटीत एका कोपऱ्यात बसणारं लोणचं (Pickle) जेवणाची चव (Test) वाढवतं. त्यामुळे जेवताना कितीतरी लोक ताटात लोणचं घेतातचं. साध्या वरणभाताची चव लोणच्याच्या एका फोडीने वाढते. गोड, तिखट अशा चवीचं लोणचं सगळ्यांच्या घरात असतं. कैरी, लिंबू, मिरची, गाजर, हळद असे कितीतरी प्रकार असतात. काही लोकांना लोणचं इतक आवडतं (Like) की त्याशिवाय त्यांना जेवणच गोड लागत नाही. लोणच्याने जेवणाची जेवढी चव वाढते. पण, सतत खाल्ल्याने आरोग्याला हानी (Bad for Health) पोहचू शकते. दररोज लोणचं खात (Daily Eating Pickle) असाल तर, त्याचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम (Side Effects on Health) जाणून घ्या. कोलेस्ट्रॉ वाढण्याचा धोका - लोणचं अतिखाण्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढण्याचा धोका असतो. लोणचं जास्त काळ टिकण्यासाठी आणि बुरशी येण्यापासून वाचण्यासाठी, लोणच्यामध्ये भरपूर तेल घातलं जातं. त्यामुळे लोणचं खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल वाढण्याचा धोका असतो. शरीरातील कोलेस्ट्रॉल वाढल्याने हृदयाशी संबंधित आजारांना आमंत्रण मिळतं. (उद्यापासून पाच दिवस स्वस्तात मिळेल सोनं; पाहा कशी आणि कुठे कराल खरेदी) सूज येऊ शकते - लोणचं जास्त खाण्यामुळे शरीरावर सूज येण्याचा त्रास होऊ शकतो. लोणचं तयार करण्यासाठी आणि ते दीर्घकाळ टिकण्यासाठी त्यात वापरले जाणारे प्रिजर्वेटिव्ह शरीरासाठी हानिकारक ठरू शकतात. त्यामुळे लोणचं जास्त खाल्ल्याने शरीरावर सूज येऊ शकते. (मैदानातून धावत येत बैलाने प्रेक्षकांवरच घेतली उडी; काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO) अ‍ॅसिडिटी आणि अल्सर - लोणच्यामध्ये मसाल्यांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. तर, अनेक प्रकारच्या लोणच्यांमध्ये व्हिनेगरचा वापर केला जातो. त्यामुळे रोज खाल्ल्याने अ‍ॅसिडिटी आणि अल्सर होण्याची शक्यता असते. तर, इतर अनेक त्रासही होऊ शकतात. (पुण्यात सोमवारपासून निर्बंध शिथिल होणार?, अजित पवारांच्या उपस्थितीत बैठक) उच्च रक्तदाबाचा धोका - लोणचं जास्त खाणाऱ्यांना हाय ब्लड प्रेशरचा त्रास होऊ शकतो. बऱ्याच प्रकारच्या लोणच्यांमध्ये मीठ मोठ्या प्रमाणावर वापरलं जातं. त्यामुळे जास्त खाल्ल्यामुळे, शरीरात मीठाचं प्रमाण वाढू शकतं. ज्यामुळे उच्च रक्तदाब आणि हृदयाशी संबंधित रोगांचा धोका वाढतो. यामुळे वॉटर रिटेंशन होण्याची समस्या देखील होऊ शकते.
  Published by:News18 Desk
  First published: