मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /साप्ताहिक राशीभविष्य : कसा जाणार तुमचा श्रावणाचा पहिला आठवडा?

साप्ताहिक राशीभविष्य : कसा जाणार तुमचा श्रावणाचा पहिला आठवडा?

दैनंदिन राशिभविष्य

दैनंदिन राशिभविष्य

उद्यापासून श्रावण सुरू होणार आहे. श्रावणाची सुरुवात तुमची कशी असेल पाहा.

आज रविवार दिनांक 8 ऑगस्ट 2021.आज दीप अमावास्या आहे. सगळ्यांनी या दिवशी शुचिर्भूत होवून दीप  उजळवून पूजा करावी.

दीप सूर्याग्नी रुप:त्वम !तेजस: तेज उत्तमम !

गृहाणाम मतकृता पूजा, सर्व काम प्रद भवेत !!

वरील मंत्र  म्हणावा. कणकेचे गोड दिवे करून नैवेद्य करावा.

उद्यापासून श्रावण सुरू होणार असून पहिला श्रावण सोमवार आहे. सुरू करूया साप्ताहिक भविष्य.

या आठवड्यात होणारे महत्त्वाचे बदल म्हणजे बुध आणि शुक्राचे राश्यांतर. 8 ऑगस्ट रोजी  रात्री बुध, सिंह या सूर्याच्या मित्र राशीत प्रवेश करेल. 9 ऑगस्टनंतर शुक्र कन्या राशीत प्रवेश करणार असून पुढील महिना तो नीच अवस्थेत असेल. गुरू कुंभ तर शनि मकर राशीत असून राहू वृषभ राशीत असेल. मंगळ बुध योग होणार असून सूर्य कर्क राशीत राहणार आहे. केतू  वृश्चिकेत असणार आहे.

मेष

राशीच्या पंचमात प्रवेश करणारा बुध काही विशेष बोलणी यशस्वी करेल. संतान चिंता कमी होईल. पण काही त्वचेचे विकार असतील तर दुर्लक्ष करू नका. आर्थिक स्थिती ठिक राहील. घरातील मोठ्या व्यक्तींना जपा. कन्येचा शुक्र मधुमेह असणार्‍यांनी सावध राहावं असं सुचवतो आहे. गुरुकृपा सर्व अडचणींवर मात करून यश मिळवून देईल. कार्यक्षेत्रातील अडचणी कमी होतील. धार्मिक गोष्टीमध्ये मन रमेल. अनुकूल सप्ताह आहे.

वृषभ

चतुर्थात प्रवेश करणारा बुध मंगळ घरासाठी काही विशेष खरेदी किंवा काही यशस्वी बोलणी करेल. शुक्राचा कन्या राशीत होणारा प्रवेश संततीकडे लक्ष ठेवा असं सुचवत आहे. राशीतील राहू अजूनही मन अशांत ठेवेल. शनि भाग्य विलंब करत असून गुरूमुळे कार्यक्षेत्रात तुमचा प्रभाव वाढेल. घरातील शांतता भंग होऊ देऊ नका. राहू जप करावा.

मिथुन

राशीच्या धनस्थानातील सूर्य कुटुंबातील मोठ्या अधिकारी व्यक्तीशी भेट करून देईल. आर्थिक लाभ होतील. तृतीय स्थानात येणारा  बुध चिकाटी, परिश्रम यात वाढ करेल. आश्रम शनि अधूनमधून काही ताण निर्माण करू शकतो. चतुर्थात प्रवेश करणारा शुक्र कामगार वर्गातील लोकांकडून त्रास दर्शवतो आहे. अपुरी झोप, आईबद्दल काही प्रश्न निर्माण करेल. गुरू सर्व संकट दूर करेल. काही शुभ घटना घडतील.

कर्क

राशीतील सूर्य तुम्हाला तेज आणि ऊर्जा बहाल करण्यात यश देईल. या आठवड्यात शुक्र पराक्रम स्थानात येणार आहे.  प्रवास, कार्य मौजमजेसाठी खर्च कराल. एकूण सप्ताहात अष्टमात असलेल्या गुरूची आराधना करावी. जोडीदाराला वेळ द्यावा. आपल्या बोलण्याने दुसर्‍याला दुखावून चालणार नाही. आर्थिक लाभ होतील. पण खर्चदेखील वाढेल. भावंडाची काळजी घ्यावी.

सिंह

राशीत प्रवेश करणारा बुध आणि तिथे असलेला मंगळ तीव्र बुद्धी आणि समय सूचकता देईल. मात्र रागावर नियंत्रण असावं. त्वचा रोग, अ‍ॅलर्जीपासून जपा. सप्तम गुरू वैवाहिक प्रस्ताव आणेल. तसंच रोजच्या जीवनात जोडीदाराकडून साथ मिळेल. शत्रू पराजित होतील. आर्थिक स्थिती सांभाळा. धन स्थानात येणारा शुक्र चैन आणि नको त्या ठिकाणी खर्च करेल. डोळ्यांचे विकार असतील तर दुर्लक्ष करू नका. कायद्याचं उल्लंघन करू नका.

कन्या

राशीत प्रवेश करणारा शुक्र रंगेल प्रवृत्तीमध्ये वाढ करतो. चारित्र्य जपा. काहींना अचानक आर्थिक लाभ मिळवून देणारा  हा ग्रह आहे. पण मोहाचे क्षण टाळले पाहिजे. परदेशी जाण्याची बोलणी सुरू होतील. नवीन खरेदी करण्याची इच्छा होईल. मधुमेही व्यक्तींनी खाण्यापिण्याचं पथ्य पाळावं. संततीसंबंधी थोडी चिंता वाटेल. गुरू उपासना करावी.

तुला

लाभ स्थानात जाणारा बुध  इतक्या दिवस केलेल्या कामाचं फळ मिळवून देईल. मित्रमैत्रिणींकडून लाभ होतील. कार्यक्षेत्रातील बदल फायद्याचे ठरतील. अधिकारी व्यक्तीशी भेट होईल. आर्थिक स्थिती उत्तम राहिल. व्यय स्थानातील शुक्र काही कटकटी उभ्या करेल. खर्च वाढतील. मोहाचे प्रसंग टाळा. उत्तरार्ध बरा राहील.

वृश्चिक

दशमात येणारा बुध काही नवीन संधी मिळवून देणार आहे. कार्यक्षेत्रातील प्रगती सुरू राहिल. वडीलांच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. आर्थिक बाजू चांगली राहिल. संतती सुख चांगलं. मातृ सुख लाभेल. नवीन वास्तु किंवा वाहन यासाठी प्रयत्‍न सुरू ठेवावे. लाभात येणारा शुक्र तरुण व्यक्तीनी जपून राहावं .धोक्याची सूचना आहे. मित्रमैत्रिणी फसगत करतील. गुरुकृपा राहिल.

धनु

अष्टमात रवी आहे. संधी येऊनही फायदा होत नाही. पण आता भाग्यात प्रवेश करणारा बुध लवकरच छानसा बदल घडवून आणेल. रखडलेलं काम ताबडतोब मार्गी लागेल. प्रवास योग येतील. गुरू पराक्रमाची वाढ करतील. कटू वचन  टाळा. डोळ्याचे त्रास होतील. दशमातील नीच राशीचा शुक्र स्त्री वर्गाकडून मानसिक त्रास सहन करावा लागेल. व्यय स्थानातील केतू आध्यात्मिक प्रगतीसाठी मार्ग दाखवेल. पूर्वार्ध प्रतिकूल आहे.

मकर

अष्टमात येणारे ग्रह आर्थिक स्थिती उत्तम ठेवतात पण शारीरिक त्रास वाढवतात. अष्टमात मंगळ बुध काही विशिष्ट चिंता लागतील. नोकरीमध्ये तुमच्या कष्टांची किंमत केली जाणार नाही. भाग्यात नीचेचा शुक्र येत आहे, जपून राहण्याचा संकेत आहे. प्रवास योग येतील. तुमच्या जोडीदाराला काही नवीन संधी मिळतील. मुलाखतीतून यश मिळवून देणारा आठवडा आहे.

कुंभ

षष्ठ सूर्य नोकरीत उत्तम संधी मिळवून देईल. सप्ताहात बुधाची उत्तम फळे मिळणार आहेत. व्यवसाय धंद्यात नवीन संधी,  नवीन करार होतील. फायदा मिळेल. राशीतील गुरू लग्नाचे प्रस्ताव आणेल. अष्टमात प्रवेश करणारा नीच शुक्र काही विशिष्ट चिंता सतावू लागतील. पोटाचे किंवा इतर काही त्रास असतील तर काळजी घ्या. आर्थिक स्थिती उत्तम राहिल.शनि उपासना करावी.

मीन

सिंह राशीत प्रवेश करणारा बुध आणि मंगळ काही प्रकृतीचे त्रास दर्शवतात. संभ्रम, तापट वर्तणूक होईल. संततीसंबंधी शुभ काळ. राहू पराक्रम आणि चिकाटी वाढवेल. सप्ताहात होणारे शुक्र भ्रमण जपून रहा, मोहाचे प्रसंग टाळा असे सांगत आहे. जोडीदार खर्चिक  होईल. चैन करावीशी वाटेल. गुरु उपासना करावी.

शुभम भवतु !!

First published:
top videos

    Tags: Astrology and horoscope, Rashibhavishya, Zodiac signs