JOIN US
मराठी बातम्या / मनी / कृषी / Punatamba Farmers Movement : पुणतांब्याच्या शेतकरी आंदोलनाला यश, ठाकरे सरकारने 70 टक्के केल्या मागण्या मान्य

Punatamba Farmers Movement : पुणतांब्याच्या शेतकरी आंदोलनाला यश, ठाकरे सरकारने 70 टक्के केल्या मागण्या मान्य

मागच्या काही दिवसांपासून पुणतांबा गावात शेतकऱ्यांचे विविध मागण्यासाठी आंदोलन सुरू होते. (Punatamba Farmers Movement)

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणतांबा, 09 जून : मागच्या काही दिवसांपासून पुणतांबा गावात शेतकऱ्यांचे विविध मागण्यासाठी आंदोलन सुरू होते. (Punatamba Farmers Movement) दरम्यान मागच्या दोन दिवसांपूर्वी ठाकरे सरकारने (Thackeray government) शेतकऱ्यांसोबत सकारात्मक चर्चा केल्याने आंदोलन दोन दिवस स्थगित करण्याचे ठरवले होते. यानंतर पुणतांबा येथे आज ग्रामसभा घेण्यात आली या ग्रामसभेत आंदोलन सुरु ठेवायचं की स्थगित करायचं? याबाबतचा निर्णय घेण्यात येणार होता परंतु सरकारने 70 टक्के मागण्या मान्य केल्याने हे आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय पुणतांबा येथील शेतकऱ्यांनी घेतला आहे. (puntamba farmers)

पुणतांबा गावातील शेतकरी आंदोलन स्थगित झाले आहे. यामध्ये किसान क्रांतीकडून आंदोलन स्थगित करत असल्याची घोषणा करण्यात आली. पुणतांबा गावात झालेल्या विशेष ग्रामसभेत एकमताने निर्णय हा निर्णय घेण्यात आला. तीन महिन्यात दिलेली आश्वासने पुर्ण केली नाही तर पुन्हा आंदोलन करण्याचाही इशारा शेतकऱ्यांकडून देण्यात आला आहे. निवडणुकांचा तोंडावर हे आंदोलन झाले असते तर राज्य सरकारला मोठा फटका बसण्याची शक्यता होती परंतु आंदोलन स्थगित झाल्याने सरकारला दिलासा मिळाला आहे.

हे ही वाचा :  Heat Wave: नागपुरात तापमानाचा पारा 45 अंशावर, 48 तासांत उष्माघातामुळे चौघांचा मृत्यू?

संबंधित बातम्या

यावेळी किसान क्रांतीकडून सांगण्यात आले कि, केवळ सरकारला विरोध करायचा म्हणून हे आंदोलन नव्हतं. आम्ही शेतकरी प्रश्नावर सर्वपक्षीय कार्यकर्ते सहभागी एकत्र आलो होतो. संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी पुणतांबा व्यासपीठ असल्याने शेतकरी प्रश्नांसाठी कायम लढा सुरू ठेवणार असल्याचे किसान क्रांती संघटनेकडून सांगण्यात आले

जाहिरात

सरकारने घेतलेले निर्णय..

थकित विज बिलाचे व्याज दंड माफ होणार…

कृषीपंपाचे पन्नास टक्के विज बिल माफ करणार…

कृषीसाठी दिवसा विज देण्यासाठी प्रयत्न

पूर्ण विजबिल भरणाऱ्यास सोलर पंपासाठी 60% अनुदान दिले जाणार.

15 जून पर्यंत ऊसाचे गाळप झाले पाहिजे…

15 जून नंतर आढावा घेऊन सरकार ऊसाला अनुदान देणार…

गाळपासाठी गेलेल्या ऊसाला प्रतीटन एक हजार नकार…

कांद्याला अनुदान देण्यास सरकारचा नकार…

जाहिरात

कांद्याच्या हमीभावासाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार…

आयात निर्यात धोरणासाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार…

दुधाच्या एआरपीसाठी कमेटी गठीत होणार…

भारतभर दुधाचा एकच दर राहावा यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार…

दुध दराच्या तफावतीमुळे दुधाला हमीभाव देणं अशक्य…

फळे आणी भाजीपाल्याचे दर निश्चित करण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा…

नियमित कर्ज भरणारांना 50 हजार रूपये अनुदान दिले जाणार…

हे ही वाचा :  MLC Election : राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानपरिषदेसाठी उमेदवारांची नावे जाहीर, एकनाथ खडसे आणि रामराजे नाईक निंबाळकरांना संधी

जाहिरात

एक जुलैपासून अनुदान थेट कर्जदाराच्या खात्यावर जमा होणार…

राज्यातील शेतकऱ्यांना दहा हजार कोटी मिळणार…

दोन लाखापेक्षा जास्त कर्ज असणारांनाही मिळणार लवकरच  कर्जमाफी…  

दोन लाखाच्या पुढची बाकी शेतकऱ्यांना भरावी लागणार…

राज्यसरकार घेणार लवकरच निर्णय…

कांदा गव्हासह इतर आयात निर्यात धोरणासाठी राज्यसरकारचं शिष्टमंडळ केंद्र सरकारची भेट घेणार…

मागेल त्या शेतकऱ्यांना सोलर पंप दिले जाणार…

सॅटेलाईट व्दारे पिकपाहणीसाठी यंत्रणा उभारणार…

खतांच्या अनुदानासाठी केंद्राकडे पाठपुरावा…

जाहिरात

पाच एकर पेक्षा कमी क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना विहीर देणार…

शेतकरी कुटुंबासाठी दोन लाख रूपयांचा विमा..  

2017 साली झालेल्या शेतकरी संप आंदोलनातील गुन्हे मागे घेतले जाणार…

सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान किंवा जिवीतहानी नसेल तर गुन्हे मागे घेतले जाणार ..

अशा सरकारने मागण्या मान्य केल्याने शेतकरी आंदोलन स्थगित करण्यात आले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या