Home /News /maharashtra /

Heat Wave: नागपुरात तापमानाचा पारा 45 अंशावर, 48 तासांत उष्माघातामुळे चौघांचा मृत्यू?

Heat Wave: नागपुरात तापमानाचा पारा 45 अंशावर, 48 तासांत उष्माघातामुळे चौघांचा मृत्यू?

Nagpur heat wave: उष्णतेची लाट जीवघेणी ठरत आहे. गेल्या 48 तासांत नागपुरात उष्णाघातामुळे चौघांचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

नागपूर, 9 जून : यंदाच्या उन्हाळ्यात प्रचंड उष्णतेची लाट (Heat wave) आल्याचं पहायला मिळालं. या कडाक्याच्या उन्हामुळे नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागला. आता जून महिना उजाडल्याने राज्यात लवकरच पावसाचं आगमन होईल आणि उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिसाला मिळेल असं बोललं जात होतं. पण मान्सून अद्याप महाराष्ट्रात दाखल झालाच नाहीये. तर दुसरीकडे उष्णतेची लाट अद्यापही कायम पहायला मिळत आहे. त्यातच आता नागपुरातून (Nagpur) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. 48 तासांत उष्माघाताचे चार बळी? नागपुरसह विदर्भात कडक उष्णतेची लाट सुरू असून मागच्या 48 तासांमध्ये उष्माघाताने नागपुरमध्ये 4 नागरिकांचा बळी घेतल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. सक्करदरा, इमामवडा, अजनी आणि सदर परिसरात चार अनोळखी व्यक्तींचा मृतदेह आढळला. प्राथमिक वैद्यकीय तपासणी केल्यानंतर उष्माघातामुळे त्यांचा मृत्यू झाला असावा अशी शक्यता वर्तवली गेली आहे. नागपूर हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढच्या दोन दिवसांमध्ये नागपूरसह विदर्भामध्ये मान्सूनपूर्व पाऊस येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना या उष्माघातापासून काहीसा दिलासा मिळेल असा अंदाज नागपुर वेधशाळेने व्यक्त केला आहे. वाचा : केंद्र सरकारकडून 14 खरीप पिकांच्या हमीभावात वाढ, नवीन दरात ‘या’ पिकांना झाला फायदा पुढील हवामानाचा अंदाज आणि इशारा 9 जून कोकण - काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र - काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. मराठवाडा - तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता. विदर्भ - तुरळक ठिकाणी हवामान कोरडे राहण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता. वाचा : Monsoon महाराष्ट्रावर नाराज? कोकणासह, कोल्हापूर, पुणे, सांगली, सातारा जिल्ह्यांना IMDकडून वादळी पावसाचा Alert 10 जून - कोकण - बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता. दक्षिण किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता. मध्य महाराष्ट्र - काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता. मराठवाडा - तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. विदर्भ - तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Heat, Maharashtra News, Nagpur

पुढील बातम्या