मुंबई, 9 जून : विधानपरिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपल्या उमेदवारांची नावे जाहीर (NCP announce list of candidates for MLC Vidhan Parishad election) केली आहेत. राष्ट्रवादीकडून दोन नावे जाहीर करण्यात आली आहेत त्यामध्ये ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) आणि रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) यांच्या नावांचा समावेश आहे. एकनाथ खडसेंना विधानपरिषदेवर संधी देण्यात येणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती मात्र, त्याच दरम्यान नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचंही बोललं जाऊ लागलं. त्यामुळे खडसेंना संधी मिळणार की नाही याबाबत विविध चर्चा सुरू होत्या. पण अखेर आज राष्ट्रवादी काँग्रेसकडून आपल्या अधिकृत उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. विधानपरिषदेच्या 10 जागांसाठी 20 जूनला निवडणूक होणार आहे. या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर राज्यात खूप महत्त्वाच्या राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. भाजप, शिवसेना, काँग्रेस नंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. राष्ट्रवादीने एकनाथ खडसेंना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश केलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांचा राजकीय वनवास संपला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे येत्या विधानपरिषद निवडणुकीसाठी श्री. रामराजे नाईक निंबाळकर आणि श्री. एकनाथराव खडसे हे उमेदवार असतील. दोन्ही उमेदवार विजयी होऊन महाराष्ट्रातील जनतेच्या सेवेसाठी कार्यरत राहतील, असा आम्हाला विश्वास आहे. @NCPspeaks
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) June 9, 2022
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर खडसेंचं पूनर्वसन करण्याचा प्रयत्न पक्षाकडून सुरु होता. त्यासाठी राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीत खडसेचं नाव पाठवण्यात आलं होतं. पण राज्यपालांनी दोन-अडीच वर्षानंतरही आमदारांची निवड केली नाही. अखेर एकनाथ खडसेंचा राजकीय वनवास थांबवण्यासाठी आता राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना विधान परिषदेवर पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. वाचा : Rajya Sabha: ‘सपा’ची 2 मते कुणाला? CMच्या भेटीनंतर अबू आझमींनी घेतला मोठा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एकनाथ खडसे आणि रामराजे नाईक निंबाळकर हे दोन्ही उमेदवार आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. महाराष्ट्र विधानपरिषद निवडणूक 2022 भाजप उमेदवार 1) प्रवीण दरेकर 2) राम शिंदे 3) श्रीकांत भारतीय 4) उमा खापरे 5) प्रसाद लाड भाजपचा आज सहावा उमेदवार अर्ज भरणार शिवसेना 1) सचिन अहिर 2) आमशा पाडवी काँग्रेस 1) चंद्रकांत हंडोरे 2) भाई जगताप राष्ट्रवादी काँग्रेस 1) रामराजे नाईक निंबाळकर 2) एकनाथ खडसे NCP चे उमेदवार आज अर्ज भरणार. अर्ज मागे घेण्याची तारीख 13 जून 2022 आहे.