मुंबई, 16 फेब्रुवारी : तरुणाईला टीक टॉक व्हिडिओचं तुफान वेड लागलं आहे. त्यासाठी अगदी जीव धोक्यात घालून अनेकदा व्हिडिओ तयार केले जातात. सध्या तरुण पिढीला टिक टॉकची भुरळ पडली आहे. अनेक तरुण टिक टॉक करण्यासाठी अनेक स्टंट बाजी करत असतात. असाच एक स्टंट तरुणाच्या जीवावर बेतला असता. मात्र तरुण त्यातून वाचला आहे. हा तरुण टिक टॉकवर व्हिडिओ अपलोड करण्यासाठी स्टंट करत होता. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. पण हा व्हिडीओ कोणता आहे हे अध्यप कळू शकले नाही. मात्र दैव बलवत्तार म्हणून तरुणाचा जीव वाचला आहे.
अनेकदा मुंबईत लोकलवर स्टंट करणाऱ्या तरुणांचे सोशल मीडियावर व्हायरल झालेले व्हिडिओ पाहिले आहेत. मात्र ह्या तरुणानं थेट एक्स्प्रेसच्या दारात उभं राहून टिक टॉकवर अपलोड करण्यासाठी स्टंट केला आणि तरुणाचा अचानक हात सुटला आणि तोल जाऊन तरुण रेल्वेखाली आला. मात्र दैव बलवत्तर म्हणून त्याचा जीव वाचला. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. पण हा व्हिडीओ कोणता आहे हे अध्यप कळू शकले नाही.