मुंबई, 15 फेब्रुवारी : चीनमधील कोरोना व्हायरसने जगभर खळबळ उडवली आहे. यामुळे चीनसह जगात भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. कोरोना व्हायरसबद्दल अनेक अफवाही पसरत आहेत. काही दिवसांपूर्वी चीन सरकार 20 हजार नागरिकांना ठार करणार अशीही अफवा पसरली होती. आता एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये हातात बंदुका असेलले लोक दिसतात. काही अंतर चालल्यानंतर रस्त्याशेजारी एक माणूस बेशुद्धावस्थेत पडलेला दिसतो. हा व्हिडिओ कंगना राणौतच्या बहिणीने शेअर केला आहे. तिनं यात दावा केला आहे की, चीनमध्ये जवळपास 25 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच व्हायरसची लागन झालेल्या लोकांना गोळी मारून ठार केलं जात आहे. व्हिडिओ चार भागांमध्ये विभागलेला असल्याचं दिसत आहे. या वेगवेगळ्या क्लिप्स मिळून एक व्हिडिओ तयार करण्यात आला आहे. यात पहिल्या 15 सेकंदाच्या भागात 3 पोलिस कारशेजारी दिसत आहेत. तर पुढच्या 16 ते 21 सेकंदाच्या काळात तेच तीन लोक एका अपार्टमेंट शिरताना दिसतात. त्यानंतर 22 ते 35 सेकंदाच्या वेळेत तिथून इतर लोक जात असताना दिसत आहेत. तर चौथ्या आणि शेवटच्या भागात रस्त्याशेजारी दोन लोक दिसत आहेत. यातील एक मृत झाल्याचं दिसत असून इथं वैद्यकीय कर्मचारी आणि काही लोक आहेत. चीनमध्ये कोरोनाची इतकी दहशत आहे की लोक घरातून बाहेर पडण्यास घाबरत आहेत. चीनने इतर देशांकडूनच प्रोटेक्टिव फेस मास्कची मागणी केली होती. वैद्यकीय पथकाला दिवसभरात अशा चार मास्कची आवश्यकता असल्याचं चीनने म्हटलं होतं. असं असताना कोणताही मास्क न घलता या व्हिडिओत काही लोक दिसत आहेत. हे कसं शक्य आहे. शेवटच्या टप्प्यात वैद्यकीय पथक दिसत आहे. त्यावेळीसुद्धा काही लोक कोणत्याही मास्कशिवाय तिथून जाताना दिसतात. कोरोनामुळे जीव गमावण्याची भीती असताना कोणीही असा धोका पत्करणार नाही.
व्हिडिओमधील शेवटच्या भागात एक पिवळ्या रंगाचे जॅकेट घातलेली व्यक्ती पडलेली दिसत आहे. याबाबद्दल फ्रान्स 24 ऑब्झर्व्हर्सने म्हटलं की, या व्हिडिओचा आणि कोरोना व्हायरसचा काही संबंध नाही. हा वुजू नावाच्या शहरात झालेल्या अपघाताचा व्हिडिओ आहे. वुहानपासून 200 किमी अंतरावर हे ठिकाण आहे. दुचाकी अपघाताच्या ठिकाणचे हे दृश्य आहे. 29 जानेवारीला हा अपघात झाला होता.
Police in Yiwu, Zhejiang said online video alleging them "shooting people sick with #coronavirus that refuse to be evacuated" is fake
— CGTN (@CGTNOfficial) February 13, 2020
The police said the video was "maliciously" manipulated with separate scenes since the armed officers were only dealing with a rabid dog pic.twitter.com/10NLLX7B1I
जॅन्ग नावाच्या व्यक्तीने याठिकाणचा दुसरा व्हिडिओ शेअर केला आहे. इथं कोरोनाग्रस्त म्हणून जो व्हिडिओ शेअर केला जात आहे त्यातल्याच दोन व्यक्ती रस्त्याकडेला दिसत आहेत. रस्त्याकडेला अपघातामुळे मोडतोड झालेलीसुद्धा दिसत आहे. कोरोनाग्रस्त लोकांना गोळी मारून ठार केल्याचा दावा खरा नाही.
चीनमध्ये कोरोनामुळे 25 हजार लोकांच्या मृत्यूचा दावा केला जात असला तरी अद्याप कोणत्याही माध्यमाने असे वृत्त दिलेले नाही. तसेच चायना ग्लोबल नेटवर्कने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत 1300 लोकांचा मृत्यू झाला असल्याचं म्हटलं आहे. बाप रे! गायकाच्या अंगावर पिंप भरून उधळले पैसे, पाहा TikTok VIDEO

)







