कोल्हापुरी माणसाचा गुंडांना हिसका, मारहाण करणाऱ्याच्या हातातून हिसकावली काठी आणि..., पाहा हा VIDEO

कोल्हापुरी माणसाचा गुंडांना हिसका, मारहाण करणाऱ्याच्या हातातून हिसकावली काठी आणि..., पाहा हा VIDEO

आर सी गँगच्या गुंडानी दुकानात घुसून लाठ्या काठ्याने कदम यांना बेदम मारहाण केली आणि पसार झाले.

  • Share this:

संदीप राजगोळकर, प्रतिनिधी

कोल्हापूर, 15 फेब्रुवारी : कोल्हापूरमध्ये एका खासगी सावकारीच्या वादातून एका चप्पल विक्रेत्याला दुकानात घुसून मारहाण केल्याची घटना घडली आहे. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे. परंतु, जेव्हा या विक्रेत्याने काठी हिस्कावून घेतली तेव्हा गुंडांनी दुकानातून धूम ठोकली.

शुक्रवारी रात्री हा प्रकार घडला. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. भिशीच्या व्यवहारातील रक्कमेवर दहा टक्के रक्कम वसुलीसाठी कोल्हापुरातील पंढरीनाथ रामचंद्र कदम या विक्रेत्याला दुकानात घुसून पाच ते सहा जणांच्या टोळक्याने बेदम मारहाण केली. आर सी गँगच्या टोळीकडून ही मारहाण केल्याचं समोर आलं आहे. आर सी गँगच्या गुंडानी दुकानात घुसून लाठ्या काठ्याने कदम यांना बेदम मारहाण केली आणि पसार झाले. परंतु, ही धुमश्च्रकी सुरू असताना कदम यांनी एका गुंडाची काठी हातात धरून ठेवली, हिंमत करून त्यांनी ती हिस्कावून घेतली. कदम यांच्या हातात काठी लागताच त्यांनी ती मारण्यासाठी उगारली तेव्हा हे 5 ते ह गुंड  धूम ठोकून पळून गेले.

काय आहे प्रकरण?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी अनिल राजहंस पोळ(वय 50) या आरोपीचा भिशीमध्ये समावेश आहे. कदम यांच्याकडे ३ लाख ८१ हजार भिशीचे पैसे जमा झाले होते. या पैशावरून कदम आणि पोळ यांच्यात वाद झाला होता. एवढंच नाहीतर सहा महिन्यांपूर्वी याच व्यवहारातून पोळ याने कदम यांच्या वृद्ध आईला मारहाण केली होती. शुक्रवारी रात्री साडेसातच्या सुमारास कदम आणि त्यांचे कामगार दुकानात असताना आरसी गँगच्या टोळीने जबरदस्तीने दुकानात घुसून मारहाण केली. या टोळीने कदम यांना भिशीतील पैशावर दहा टक्के व्याजाने प्रत्येक महिन्याला दहा हजार तुला द्यावे लागतील, अशी खंडणीची मागणी करुन बेदम मारहाण केली.

या प्रकरणी कोल्हापुरातील जुना राजवाडा पोलीस ठाण्यात खासगी सावकाराविरोधात गुन्हा दाखल केला आहे. जुनाराजवाडा पोलीसांनी खासगी सावकार अनिल पोळ याला अटक केली. आरसी गँगचे सनी राम साळे, विशाल सुरेश पवार, अमित अंकुश बामणे, विक्रम जाधव हे पसार असून त्यांचा पोलीस शोध घेत आहेत. या सर्वांवर बेकायदेशी भिशी, सावकारकी, मारहाण आणि खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.

बाप रे! गायकाच्या अंगावर पिंप भरून उधळले पैसे, पाहा TikTok VIDEO

टीक टॉकवर कधी कशाचे व्हिडिओ तयार केले जातील आणि ते व्हायल होईल याचा काही नेम नाही. एकीकडे महागाई वाढत चालली आहे तर दुसरीकडे सांस्कृतिक कार्यक्रमात पैशांची उधळण होत असल्याचं पाहायला मिळत आहे. एका संगीताच्या कार्यक्रमात पिंप भरून पैसे गायकाच्या अंगावर ओतल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. गायकाच्या अंगावर अक्षरश: पिंप भरून पैशांचा पाऊस पाडला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. टीक टॉकवर या व्हिडिओला 116. 6 हजार लाईक्स आणि 42 कमेंट्स आल्य़ा आहेत. या व्हिडिओची सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चा होत आहे.

@gajju.bhai...007full #moj #DanceWithDarkFantasy #oyeitsprank noddy.lly_ vishnupriya__14

♬ original sound - syedaslam07

@gajju.bhai...007#full #moj #moj 💴💴💴 #noddy.lly_ #DanceWithDarkFantasy #vishnupriya__14 #DanceWithDarkFantasy #

♬ original sound - dharmikramanandi

उत्तर भारतात संगीताच्या कार्यक्रमात अशा पद्धतीनं पैसे उधळण्याची प्रथा आहे. तर काही संस्था हे पैसे धर्मशाळेत दान करत असल्याचा दावा करतात. ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता कशा पद्धतीनं पिंप भरून पैसे गायकाच्या अंगावर उधळले आहेत.

First Published: Feb 15, 2020 07:32 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading