मुंबई 17 जानेवारी : आपल्याला आयुष्यात काहीही प्रॉबलम आला किंवा काहीतरी माहिती मिळवायची असेल तर आपण म्हणतो की जास्त का विचार करतोय? गुगल कर... आपल्याला हे माहित आहे की बऱ्याच प्रश्नांची उत्तरे आपल्याला गुगल देतो. म्हणून तर आपण काहीही झालं की म्हणतो अरे गुगल कर ना भाऊ...
गुगलवर आपण काय-काय नाही शोधत अगदी जेवण बनवण्यापासून ते फॉर्म कसा भरावा, ते अगदी एखाद्या ठिकाणी कसं पोहोचायचं त्यासाठीचे पर्यायी मार्ग, आपण सगळं गुगलवर सर्च करतो. शिवाय अनेक लोक लोन किंवा बँक फोननंबर पर्यंत सगळ्याच गोष्टी सर्च करतात.
गुगल किंवा इंटरनेटमुळे आपले जीवन अनेक प्रकारे सोपे झाले आहे, परंतु प्रत्येक नाण्याच्या दोन बाजू असतात. त्याप्रमाणे गुगल वापरण्याच्या देखील आहेत. याच्या फायद्यासोबतच गुगलचे तोटे देखील आहे.
एक सायबर फसवणुकीची प्रकरण समोर येत आहेत. जे ऐकून तुम्हाला कळेल की गुगलवर सगळ्याच गोष्टी शोधण तुम्हाला कसं महागात पडू शकतं.
हे ही वाचा : Credit Card वापरणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर कर्जाची परतफेड कोण करतं?
हे प्रकरण मुंबईतील आहे. या प्रकरणात पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे.
काय आहे नवीन घोटाळा प्रकरण?
एका महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे, मात्र या संपूर्ण प्रकरणात एक गोष्ट महत्वाची आहे ती म्हणजे या महिलेसोबत घडलेला हा प्रकार. असा प्रकार कोणासोबत देखील घडू शकतो आणि लोकांनी सतर्क राहावं यासाठी पोलिसांनी हा प्रकार सर्वासमोर आणला आहे.
महिलेने तिच्या घरातील सामान शिफ्ट करण्यासाठी पॅकर आणि मूव्हर्सना बोलावले होते.
फोनवर बोलताना असा आवाज आला तर समजून जा तुमचा फोन रेकॉर्ड होतोय
पीडितेने सांगितले की, तिच्या फोननंतर चार लोक घरी पोहोचले, त्यापैकी एकाने तिच्याकडून 2500 रुपये घेतले आणि टीव्ही उचलून निघून गेले. त्यांनी सांगितले की त्यांनी सामान हलवण्यास सुरुवात केली, परंतु बराच वेळ झाला तरी जेव्हा कोणीही परत आले नाही तेव्हा महिलेचे डोळे उघडले.
पीडितेने या प्रकरणाची माहिती भोईवाडा पोलिसांना दिली, त्यांनी एका व्यक्तीला अटक केली. हा किरकोळ गुन्हा वाटत असला तरी या महिलेसोबत मोठी फसवणूक होऊ शकली असती. महिलेने सांगितले की, तिला एका वेबसाइटवरून मूव्हर्स आणि पॅकर्सचा नंबर मिळाला, तिने त्यावर फोन केला आणि तिथेच सगळं संपलं.
लोकांना बनावट क्रमांक कसे मिळतात?
असे बरेच लोक आहेत जे थेट गुगलवर जाऊन कोणाचाही नंबर शोधतात. समजा तुम्हाला एखाद्या बँकेचा नोएडा सेक्टर 18 शाखा क्रमांक हवा असेल, तर तुम्ही प्रथम Google वर काय टाइप कराल? बहुतेक लोक बँकेचे नाव आणि पत्ता टाइप करून कस्टमर केअर नंबर शोधतील. या प्रकरणात, तुम्हाला प्रथम Google Map सह निकाल दिसेल.
हे फक्त बँकेतच नाही तर इतर कोणत्याही सेवेसह होऊ शकते. गुगल मॅप्ससह दिसणार्या पर्यायावर क्लिक करताच, नकाशासह तपशीलवार पेज तुमच्या समोर येईल. याच गोष्टीचा फायदा घेत अनेक ठग लोकांना गंडा घालतात. तेथे हे लोक आपला नंबर टाकतात आणि त्यावर कॉन्टॅक्ट करताच लोक फसतात.
खरंतर तुम्ही जेव्हा गुगलवर जाता किंवा काहीही सर्च करता तेव्हा तुम्हाला तेथे नंबर आणि इतर तपशील दिसतील, तर सजेस्ट अॅन एडिटचा पर्यायही उपलब्ध असेल. त्यावर क्लिक केल्यावर तुम्हाला नाव बदला किंवा इतर तपशील या दोन पर्यायांसह बंद करा किंवा काढा असा पर्याय मिळेल.
पहिल्या पर्यायावर क्लिक केल्यावर, तुम्हाला नाव तसेच नंबर, वेबसाइट आणि इतर तपशील बदलण्याचा पर्याय मिळेल. स्कॅमर येथून कोणताही डेटा काढू शकतात किंवा कोणीही बनावट तपशील तयार करू शकता.
यामुळे, जेव्हा कोणी ऑनलाइन नंबर शोधून कॉल करतो तेव्हा त्याचा कॉल स्कॅमरकडे जातो. त्याच्या मदतीने घोटाळेबाज लोकांची फसवणूक करण्याचे काम करतात.
आता हे सर्व कसे टाळता येईल हा प्रश्न उपस्थीत होतो. तर जर तुम्ही बँकेचा नंबर शोधलात, तर नंबर फक्त तिच्या अधिकृत वेबसाइटवरून काढा. अगदी बँकेच्या ऍप्सवरही तुम्हाला असे तपशील सहज मिळतील. दुसरीकडे, जर तुम्ही इतर कोणत्याही सेवेसाठी नंबर शोधत असाल, तर केवळ प्रामाणिक सेवा प्रदात्याशी संपर्क साधा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Google, Money fraud, Social media, Social media trends, Viral