जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Credit Card वापरणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर कर्जाची परतफेड कोण करतं?

Credit Card वापरणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर कर्जाची परतफेड कोण करतं?

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

समजा क्रेडिट कार्ड वापरत्याकर्त्याचा मृत्यू झाला तर त्यानं घेतलेल्या कर्जाचं काय होतं? ही थकबाकी परत करण्याची जबाबदारी कोणाची असेल? तसेच ती माफ केली जाते का? चला याची उत्तर जाणून घेऊ.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई 05 जानेवारी : आजच्या काळात क्रेडिट कार्डचा वापर एकदम सामान्य झाल आहे. लोक याचा वापर करुन पैसे नसताना ही वस्तू खरेदी करतात आणि नंतर त्याचे पैसे पुन्हा बँकेला देतात. यामुळे अनेकांचं आयुष्य थोडं सोप झालं आहे. याशिवाय क्रेडिट कार्डवर अनेक प्रकारच्या ऑफर आणि सूटही उपलब्ध आहेत. प्रत्येकाची क्रेडिट कार्ड मर्यादा वेगळी असते. पण याचा योग्य वापर करणे गरजेचं आहे. तरंच तुम्हाला याचा फायदा होईल. नाहीतर तुम्ही याच्या कर्जामध्ये इतके बुडाल की मग यातून बाहेर येणं देखील कठीण जाईल. फायदे कितीही असले तरी क्रेडिट कार्ड हे देखील एक प्रकारचे कर्ज आहे हे ही खरे आहे. ते वेळेवर न भरल्याने दंड, व्याज भरावे लागतात. फोनवर बोलताना असा आवाज आला तर समजून जा तुमचा फोन रेकॉर्ड होतोय यासंबंधीत लोकांना बरेच प्रश्न पडतात. त्यांपैकी एक कॉमन आणि लोकांच्या फायद्याचा प्रश्न म्हणजे, समजा क्रेडिट कार्ड वापरत्याकर्त्याचा मृत्यू झाला तर त्यानं घेतलेल्या कर्जाचं काय होतं? ही थकबाकी परत करण्याची जबाबदारी कोणाची असेल? तसेच ती माफ केली जाते का? चला याची उत्तर जाणून घेऊ. क्रेडिट कार्डे असुरक्षित कर्जाच्या श्रेणीत ठेवली जातात. यासाठी तुम्हाला कोणतीही जमीन, एफडी किंवा तुमची कोणतीही मालमत्ता गहाण ठेवण्याची गरज नाही. यामध्ये अर्जदाराचे उत्पन्न, क्रेडिट स्कोअर, विद्यमान कर्ज आणि परतफेडीचा इतिहास इत्यादींच्या आधारे कार्डची क्रेडिट मर्यादा निश्चित केली जाते. अशा परिस्थितीत क्रेडिट कार्डद्वारे खर्च केलेल्या रकमेची परतफेड करण्याची जबाबदारीही क्रेडिट कार्डधारकाची असते. परंतु जर क्रेडिट कार्ड वापरकर्त्याचा रक्कम परत करण्यापूर्वी मृत्यू झाला, तर बँक कर्जाची थकबाकी राइट ऑफ करते. म्हणजेच काय तर, अशा परिस्थितीत कुटुंबातील इतर कोणत्याही सदस्याला थकबाकी भरण्यास भाग पाडले जाऊ शकत नाही. सुरक्षित क्रेडिट कार्ड किंवा एफडीवर क्रेडिट कार्ड आजकाल अनेक सुरक्षित क्रेडिट कार्ड देखील उपलब्ध आहेत. सुरक्षित क्रेडिट कार्ड बहुतेक लोक घेतात. सुरक्षित क्रेडिट कार्ड मिळवण्यासाठी काहींना आपली एफडी बनवावी लागते आणि त्यावर कर्ज उपलब्ध केलं जातं. या केसमध्ये जर क्रेडिट कार्ड वापरत्याकर्त्याने पैसे दिले नाही किंवा त्याचा मृत्यू झाला तर बँकेला त्याचे मुदत ठेव खाते (एफडी) एनकॅश करून त्याचे कर्ज वसूल करण्याचा अधिकार आहे.

News18लोकमत
News18लोकमत

वैयक्तिक कर्ज घेतलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर काय? वैयक्तिक कर्ज देखील असुरक्षित कर्जाच्या श्रेणीत असतात. अशा परिस्थितीत क्रेडिट कार्डप्रमाणे वैयक्तिक कर्जाची परतफेड करण्याची जबाबदारीही कर्ज घेणाऱ्या व्यक्तीची असते. कर्जदाराचा कोणत्याही कारणाने मृत्यू झाल्यास, बँक त्याच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला कर्जाची परतफेड करण्यास भाग पाडू शकत नाही. अशा स्थितीत कर्जही त्याच्या मृत्यूनेच संपते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात