नवी दिल्ली 04 ऑगस्ट : लाइफ पार्टनर्सच्या (Life Partners) वयातील अंतराची (Age Gap) अनेक उदाहरणं तुम्ही आजपर्यंत पाहिली असतील. मात्र, सध्या समोर आलेली एक घटना ऐकून तुम्हीही हैराण व्हाल. 7 मुलांची आई असलेल्या मर्लिन बटिगिएग हिनंदेखील कधी विचार केला नसेल की आपल्या मुलाच्या ज्या मित्राला ती व्हिडिओ गेम (Video Game) खेळण्यापासून थांबवत होती, तोच तिचा लाईफ पार्टनर बनेल. आपल्याच मुलाचा मित्र विलियम स्मिथ याच्या प्रेमात (Love) बुडालेल्या मर्लिननं केवळ त्याच्यासोबत लग्नगाठच (Marriage) बांधली नाही तर जगाचे टोमणेही ऐकले. या कपलच्या लग्नाला आता 12 वर्ष पूर्ण झाले आहेत.
त्यावेळी मर्लिन 35 वर्षाची होती जेव्हा ती आपल्या मुलांसोबत वेस्ट ससेक्सच्या क्रॉलीमध्ये राहत होती. तेव्हाच तिच्या मुलाचा 17 वर्षीय मित्र विलियम यानं तिला घरातील कामात मदत करण्याची ऑफर दिली. मर्लिनला मसल पेनचा त्रास व्हायचा. याच काळात मर्लिन आणि विलियम एकमेकांच्या जवळ आले. मर्लिन म्हणते, की या निर्णयामुळे दोघांचेही कुटुंबीय सदम्यात होते. मात्र, मर्लिनच्या कुटुंबीयांनी त्यांच्या मैत्रीचं नातं समजून घेतलं, कारण विलियम तिची भरपूर मदत करायचा.
20 आवाज काढत चालली झुकझुक आगीनगाडी; पुन्हा पुन्हा पाहावासा वाटेल हा VIDEO
मर्लिननं सांगितलं, की तिला विलियमला आपल्यापासून दूर जाऊ द्यायचं नव्हतं आणि तिला आता मुलंही नको होती. मात्र, तिनं कधीही विलियमला कुटुंब बनवण्यापासून थांबवलं नाही. चित्रपट निर्माता असलेल्या विलियमनं म्हटलं, की मला माहिती होतं, की आमच्यामध्ये काहीतरी खास आहे. ती माझी ड्रीम वुमन होती आणि आजही आहे. या नव्या नात्यानंतर लवकरच हे कपल एकत्र राहू लागलं होतं. यानंतर मर्लिनच्या एका मुलानं तिच्यासोबतचं नातं तोडलं आणि विलियमच्या कुटुंबीयांनीही त्याच्यासोबत बोलणं बंद केलं. मात्र, तरीही आम्ही आनंदी असल्याचं या कपलनं म्हटलं.
क्रेडिट कार्डचं बिल न भरल्यानं शरीरसुखाची मागणी; थकीत पैशांसाठी महिलेचा छळ
फेब्रुवारी 2009 मध्ये या कपलनं लग्न केलं होतं. आता त्यांच्या लग्नाला 12 वर्ष झाली आहेत. तर, ते दोघंही 15 वर्षांपासून एकमेकांसोबत राहत आहेत. इतक्या वर्षांनंतरही आजदेखील त्यांना लोकांचे टोमणे ऐकावे लागतात. मर्लिननं सांगितलं, की लोकं आमच्याकडे रागानं पाहत असतात. मात्र, मला याची खात्री आहे, की विलियमपेक्षा जास्त प्रेम माझ्यावर कोणीच करू शकलं नसतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Couple, Love story, Marriage