जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / औरंगाबाद / Aurangabad: क्रेडिट कार्डचं बिल न भरल्यानं शरीरसुखाची मागणी; थकीत पैशांसाठी महिलेचा छळ

Aurangabad: क्रेडिट कार्डचं बिल न भरल्यानं शरीरसुखाची मागणी; थकीत पैशांसाठी महिलेचा छळ

Aurangabad: क्रेडिट कार्डचं बिल न भरल्यानं शरीरसुखाची मागणी; थकीत पैशांसाठी महिलेचा छळ

Crime in Aurangabad: क्रेडिट कार्डचं बिल (Credit Card Bill) थकलं म्हणून एका महिलेकडे शरीरसुखाची (Demand sexual relation) मागणी केल्याची संतापजनक घटना औरंगाबादमध्ये उघडकीस आली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

औरंगाबाद, 04 ऑगस्ट: क्रेडिट कार्डचं बिल (Credit Card Bill) थकलं म्हणून एका महिलेकडे शरीरसुखाची (Demand sexual relation) मागणी केल्याची संतापजनक घटना औरंगाबादमध्ये (Aurangabad) उघडकीस आली आहे. पीडित महिलेकडे एका नामांकित बँकेचं क्रेडिट कार्ड होतं. पण मागील दिवसांपासून त्यांनी क्रेडिट कार्डचं बिल भरलं नव्हतं. त्याच्या क्रेडिट खात्यावर एकूण वीस हजार रुपयांची थकबाकी होती. या पैशांच्या बदल्यात आरोपी कर्मचाऱ्यांनं महिलेकडे थेट शरीरसुखाची मागणी केली आहे. याप्रकरणी महिलेनं पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत. खरंतर, औरंगाबाद येथील एका बँकेनं आपल्या ग्राहकांकडील थकीत कर्ज आणि हफ्ते वसुल करण्याचं काम एका थर्ड पार्टीला दिलं आहे. दरम्यान वसुली कंपनीच्या एका कर्मचाऱ्यानं क्रेडिट कार्डच्या बिलाच्या मोबदल्यात महिलेकडे शरीरसुखाची मागणी केली आहे. याशिवाय आरोपीनं महिलेला शिवीगाळ देखील केल्याचा आरोप पीडित महिलेनं आपल्या तक्रारीत केला आहे. हेही वाचा- एका हातानं गळा अन् दुसऱ्या हातानं दाबलं तोंड; 2वर्षाच्या मुलीचा आईनंच घेतला जीव क्रेडिट बिलची वसुली करणाऱ्या कंपनीच्या कर्मचाऱ्याने अश्लील शब्दांत मसेज केल्यानंतर पीडित महिलेनं  पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मात्र पोलिसांनी या तक्रारीकडे दुर्लक्ष करत कोणतीही कारवाई केली नसल्याचंही फिर्यादीनं म्हटलं आहे. यानंतरही आरोपी कर्मचाऱ्यानं आपलं कृत्य थांबवलं नाही. क्रेडिट कार्डच्या थकीत बिलासाठी आरोपीनं पीडित महिलेकडे थेट शरीरसुखाची मागणी केली. हेही वाचा- 17 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात मुंबईतील TikTok स्टारवर गुन्हा वसुली कर्मचाऱ्याच्या त्रासाला कंटाळून पीडित महिलेनं औरंगाबाद शहरातील सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्यात पुन्हा तक्रार दाखल केली. पण पोलिसांनी फक्त अदखलपात्र गुन्हा दाखल केला. शिवाय अश्लील मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीच्या तपासाच्या नावाखाली पोलीस फिर्यादी महिलेच्या पतीला दिल्लीला घेऊन गेले, असा आरोपही पीडित महिलेनं केला आहे. या घटनेचा पुढील तपास सिडको पोलीस करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात