मराठी बातम्या /बातम्या /Viral /

फक्त झुकझुक नाही तर 20 आवाज काढत चालली आगीनगाडी; पुन्हा पुन्हा पाहावासा वाटेल हा VIDEO

फक्त झुकझुक नाही तर 20 आवाज काढत चालली आगीनगाडी; पुन्हा पुन्हा पाहावासा वाटेल हा VIDEO

मधूर आवाज ऐकवत जाणारी जलतरंग रेल (Jaltarang train).

मधूर आवाज ऐकवत जाणारी जलतरंग रेल (Jaltarang train).

मधूर आवाज ऐकवत जाणारी जलतरंग रेल (Jaltarang train).

  • Published by:  Priya Lad

मुंबई, 04 ऑगस्ट : 'झुकझुक आगीनगाडी...' हे गाणं आपण लहानपणीच शिकलो आहे. आजही हे बालगीत आपल्या तोंडात येतंच. ट्रेनचा (Train) किंवा रेल्वेगाडीचा (Train video) आवाज कसा असं विचारल्यावर आपण झुकझुक असंच सांगतो. झुकझुक झुकझुक अशीच करत ट्रेन (Musical train) चालते. पण आम्ही तुम्हाला आता अशी ट्रेन दाखवणार आहोत जी फक्त झुकझुक नाही तर तब्बल 20 आवाज काढत चालते आहे (Train play 20 melody music tune).

सोशल मीडियावर एका ट्रेनचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ही ट्रेन चालताना 20 सुंदर ट्युन वाजवत जाताना दिसते. आयपीएस अधिकारी रुपिन शर्मा यांनी या सुंदर जलतरंग रेलचा (Jaltarang train) व्हिडीओ आपल्या ट्विटरवर पोस्ट केला आहे.

त्यांनी ट्विटरवर दिलेल्या माहितीनुसार जर्मन तज्ज्ञांनी तयार केलेली ही जलतरंग ट्रेन. त्यांनी टॉय ट्रेन (Toy train) वापरली आहे.

हे वाचा - आश्चर्यच! चक्क कुत्र्यासारखा भुंकतो हा पक्षी; विश्वास बसत नाही तर पाहा VIDEO

तब्बल 201 मीटर इतका लांब या ट्रेनचा मार्ग आहे. या रेल्वे ट्रॅकच्या दोन्ही बाजूंनी तब्बल 2840 ग्लास ठेवले आहेत, ज्यात पाणी भरलेलं आहे (Glasses filled with water). हे ग्लास एका विशिष्ट आणि वेगवेगळ्या अंतराने ठेवण्यात आले आहे. तसंच ट्रेनची रचना अशी केली आहे, की ती रेल्वे ट्रॅकवरून पळताना दोन्ही बाजूच्या पाण्याने भरलेल्या ग्लासला स्पर्श करून जाईल.

हे वाचा - कोण म्हणतं वयानं म्हातारं होतं? 101 वर्षांच्या आजीचं काम पाहून तोंडात बोटं घालाल

व्हिडीओत पाहू शकता जेव्हा ट्रेन रेल्वेट्रॅकवरून धावते तेव्हा ती या ग्लासना स्पर्श करत जाते. त्यावेळी एक आवाज ऐकू येतो. एक नाद तयार होतो. सुंदर असं संगीत ऐकायला मिळतं. अशा पद्धतीने ही ट्रेन तब्बल 20 प्रकारचे आवाज काढते. म्हणजे तब्बल 20 गोड ट्युन ऐकायला मिळतात.

First published:

Tags: Song, Train, Viral, Viral videos