मराठी बातम्या /बातम्या /Viral /का रे दुरावा! लग्नानंतर हनिमूनसाठी आयर्लंडला गेलं कपल; विमानतळावरच घडलं असं काही की झाला हिरमोड

का रे दुरावा! लग्नानंतर हनिमूनसाठी आयर्लंडला गेलं कपल; विमानतळावरच घडलं असं काही की झाला हिरमोड

27 वर्षीय एमी आणि 33 वर्षीय अल्बर्टो हे पश्चिम लंडनच्या किस्विकचे रहिवासी आहेत. लग्नाच्या 3 दिवसानंतर ते हनिमूनसाठी आयर्लंडला  (Ireland) पोहोचले.

27 वर्षीय एमी आणि 33 वर्षीय अल्बर्टो हे पश्चिम लंडनच्या किस्विकचे रहिवासी आहेत. लग्नाच्या 3 दिवसानंतर ते हनिमूनसाठी आयर्लंडला (Ireland) पोहोचले.

27 वर्षीय एमी आणि 33 वर्षीय अल्बर्टो हे पश्चिम लंडनच्या किस्विकचे रहिवासी आहेत. लग्नाच्या 3 दिवसानंतर ते हनिमूनसाठी आयर्लंडला (Ireland) पोहोचले.

नवी दिल्ली 29 सप्टेंबर : लग्नानंतर जोडपे त्यांच्या हनिमूनसाठी (Honeymoon) मोठे नियोजन करतात. एकत्र बाहेर जाण्याबद्दल त्यांची अनेक स्वप्नं असतात. एक ब्रिटीश जोडपं काही अशीच स्वप्नं घेऊन बार्बाडोसला पोहोचलं. येथे पोहोचल्यानंतर जेव्हा वधूची कोरोना चाचणी (Corona Test) झाली, तेव्हा तिची सर्व स्वप्नंच भंगली. एकमेकांच्या सहवासासाठी बाहेर फिरायला आलेलं हे जोडपं त्याच रात्री विभक्त झालं.

काठीनं बदडत माकडानं घडवली कुत्र्याला अद्दल; हा मजेशीर VIDEO एकदा बघाच

27 वर्षीय एमी आणि 33 वर्षीय अल्बर्टो हे पश्चिम लंडनच्या किस्विकचे रहिवासी आहेत. लग्नाच्या 3 दिवसानंतर ते हनिमूनसाठी बार्बाडोस, आयर्लंडला (Ireland) पोहोचले. लंडन सोडण्यापूर्वी दोघांनी आवश्यक पीसीआर चाचणी केली होती, ज्याचा अहवाल निगेटिव्ह आला. जेव्हा ते ब्रिजटाउन विमानतळावर (Bridgetown Airport) पोहोचला, तेव्हा त्यांची पुन्हा चाचणी करण्यात आली आणि त्यांना रिपोर्टची (Corona Report) वाट पाहण्यास सांगितलं गेलं. अल्बर्टोची चाचणी निगेटिव्ह आली, परंतु त्याला एमीच्या रिपोर्टची वाट पाहण्यास सांगितले गेले.

बराच वेळ वाट पाहिल्यानंतर एमीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. संध्याकाळी पाच वाजता एमीला याची माहिती देण्यात आली आणि तिला तयार राहण्यास सांगितलं गेलं. रात्री ९ वाजता एमीला हॉटेलमधून सरकारी आयसोलेशन सेंटरमध्ये पोहोचवलं गेलं. हे सेंटर एका प्रायमरी स्कूलमध्ये बनवलं गेलं होतं आणि तिला पुढचे दहा दिवस इथेच राहण्यास सांगण्यात आलं. एमीच्या पतीला आपल्या पत्नीची ही अवस्था बघवली नाही आणि तो रात्रभर तिच्यासोबत फोनवर बोलत राहिला. एमीला सहा अनोळखी लोकांसोबत रुम शेअर करायची होती. सोबत टॉयलेट आणि पाण्याचीही सुविधाही व्यवस्थित नव्हती.

अरारारा... खतरनाक! बैलाची भारी करामत; Stunt Video पाहून नेटिझन्स हैराण

एमीची अवस्था पाहून तिच्या पतीनं तिला सरकारी आयसोलेशन सेंटरमधून (Government Isolation Center) खासगी रुग्णालयात हालवलं. याठिकाणी दररोज वार्डचा खर्च 22 हज़ार रुपये आणि डॉक्टरची फी 18 हज़ार होती. यामुळे त्यांचे बरेच पैसे खर्च झाले. तिच्या पतीनंही स्वतःला आयसोलेट करण्यासाठी एका स्वस्त फ्लॅटमध्ये स्वतःची व्यवस्था केली. आधी त्यांनी जे हॉटेल बूक केलं होतं, त्या हॉटेलनं त्यांना रिफंडही दिला नाही. शेवटची फ्लाईटसाठी लाखो रुपये खर्च करून या कपलला घरी परतावं लागलं आणि सर्व पैसे खर्च झाल्यानं तिथून परतताच त्यांना कामावरही जावं लागलं.

First published:

Tags: Couple, Viral news