नवी दिल्ली 29 सप्टेंबर : सोशल मीडियावर (Social Media) प्राण्यांचे अनेक व्हिडिओ व्हायरल (Viral Videos of Animals) होताना दिसतात आणि हे व्हिडिओ लोकांच्या पसंतीसही उरतात. यातील काही व्हिडिओ इतके खास असतात की ते वारंवार पाहण्याची इच्छा होते. तर, काही व्हिडिओ हैराण करणारे असतात. काही असेही असतात जे भावुक करून जातात. मात्र, अनेकदा असे व्हिडिओही समोर येतात जे पाहून हसू आवरणं कठीण होऊन जातं. सध्या असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही.
अरारारा... खतरनाक! बैलाची भारी करामत; Stunt Video पाहून नेटिझन्स हैराण
कुत्रा आणि माकड या दोघांनाही अतिशय समजदार प्राणी समजलं जातं. मात्र, सध्या समोर येणाऱ्या एका व्हिडिओमध्ये एक माकड कुत्र्याला अशी अद्दल घडवताना दिसतं की कुत्रा आयुष्यभर लक्षात ठेवेल. व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये (Funny Video of Dog and Monkey) तुम्ही पाहू शकता की एक कुत्रा माकडाला त्रास देत आहे. काही वेळ माकड हे सगळं सहन करतं. मात्र, नंतर त्याच्या लक्षात येतं हा कुत्रा सहजासहजी शांत होणार नाही.
यानंतर माकड रागावतं आणि एक काठी उचलतं. यानंतर या काठीनं कुत्र्यावर जोरात हल्ला करतं. यानंतर मार लागल्यानं कुत्रा जोरजोरात ओरडू लागतो आणि तिथून निघून जातो.
इंजिनिअरिंगची कमाल! डोंगराखाली बोगद्यात सहा पदरी महामार्ग; वरून वाहतोय कालवा
सोशल मीडियावर या विनोदी व्हिडिओला लोकांची चांगलीच पसंती मिळत आहे. याच कारणामुळे अनेकांनी या व्हिडिओवर मजेशीर कमेंट केल्या आहेत. एका यूजरनं कमेंट करत लिहिलं, की खरंच कुत्र्यानं माकडाला अतिशय मजेशीर पद्धतीनं अद्दल घडवली आहे. दुसऱ्या एका यूजरनं लिहिलं, की हा व्हिडिओ पाहून मला हसू आवरत नाहीये. याशिवाय इतरही अनेक यूजर्सनी या व्हिडिओवर कमेंट केल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Funny video, Wild animal