Home /News /viral /

कार चालवताना अचानक बेशुद्ध झाली महिला; गाडी आपोआप रस्त्यावर धावू लागली अन्.., थरारक घटनेचा VIDEO

कार चालवताना अचानक बेशुद्ध झाली महिला; गाडी आपोआप रस्त्यावर धावू लागली अन्.., थरारक घटनेचा VIDEO

कार चालवत असताना एक महिला अचानक बेशुद्ध पडली (Woman Fainted While Driving) आणि कार रस्त्यावर स्वतःहून पुढे जाऊ लागली. इथे नक्की काय सुरू आहे, हे सुरुवातीला कोणालाच समजलं नाही

    नवी दिल्ली 13 मे : रस्त्यावर अपघात झाल्यास सर्वसामान्य नागरिक तातडीने मदतीसाठी पुढे येतात. अपघातापूर्वी काय होणार हे कोणालाच माहीत नसतं. अमेरिकेतून सध्या अतिशय निराळं एक प्रकरण समोर आलं आहे. यात कार चालवत असताना एक महिला अचानक बेशुद्ध पडली (Woman Fainted While Driving) आणि कार रस्त्यावर स्वतःहून पुढे जाऊ लागली. इथे नक्की काय सुरू आहे, हे सुरुवातीला कोणालाच समजलं नाही. मात्र घटनेची कल्पना येताच रस्त्यावर उपस्थित काही लोक तात्काळ मदतीसाठी पुढे आले. सध्या या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Shocking Video Viral on Social Media) होत आहे. डान्स करण्यासाठी महिलेला हात पकडून स्टेजवर खेचलं अन्...; लग्नातच पाहुण्यांची तुफान हाणामारी, Video Viral व्हिडिओमध्ये काँग्रेस एव्हेन्यूच्या ट्रॅफिक चौकात सिग्नल पडलेला असतानाही एका महिलेची कार हळूहळू पुढे सरकताना दिसते. कारच्या आत बसलेली महिला बेशुद्ध पडली आहे आणि कार स्वतःहून पुढे जात असल्याचं रस्त्यावरील इतर वाहनधारकांच्या लक्षात आलं. यानंतर लोकांनी तात्काळ बाहेर येत, ही गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने कार ज्या दिशेने जात होती तिथून एकही वाहन भरधाव वेगात आलं नाही, अन्यथा मोठा अपघात होऊ शकला असता. लोकांनी धावत जाऊन हाताने ही गाडी थांबवली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रस्त्याने जाणाऱ्या लोकांनी महिला आपल्या कारच्या स्टेअरिंगवर बेशुद्ध पडली असल्याचं पाहिलं. यानंतर ही गाडी आपोआप पुढे चालत राहिली. हे वाहन थांबवण्यासाठी अनेकजण आपल्या कारमधून खाली उतरले. कार थांबल्यानंतर एका महिलेनं आपल्या कारमधून डंबेल काढून एका पुरुषाला दिले, त्याने महिलेला वाचवण्यासाठी कारची बाजूची खिडकी तोडली. यानंतर कारचं लॉक उघडून महिलेला वैद्यकीय मदत देण्यात आलीलॉरी राब्योर असं या महिलेचं नाव असून ती . वेस्ट पाम बीच येथील रहिवासी आहे. Shocking Video! लग्न होताच नवरा-नवरीने स्वतःला पेटवून घेतलं; पाहुणे मात्र पाहून हसू लागले राब्योराने सांगितलं की, उच्च रक्तदाबाच्या गोळ्या घेतल्याने आणि मेडिकल प्रोसिजरसाठी उपवास केल्याने तिला चक्कर आली. पोलिसांनी तिला मदत करणाऱ्या लोकांना शोधलं आहे. लवकरच ते लॉरीची या लोकांसोबत भेट घालून देणार आहेत.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Shocking accident, Shocking video viral

    पुढील बातम्या