Home /News /viral /

डान्स करण्यासाठी महिलेला हात पकडून स्टेजवर खेचलं अन्...; लग्नातच पाहुण्यांची तुफान हाणामारी, Video Viral

डान्स करण्यासाठी महिलेला हात पकडून स्टेजवर खेचलं अन्...; लग्नातच पाहुण्यांची तुफान हाणामारी, Video Viral

सध्या लग्नातील एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. या लग्नादरम्यानच नाचणारे नातेवाईक एकमेकांशी भिडल्याचं पाहायला मिळतं (Fight Between Guest During Wedding Function).

    नवी दिल्ली 13 मे : भारतीय विवाहसोहळे रंग, परंपरा, प्रेम, संगीत अशा विविध गोष्टींनी परिपूर्ण असतात. लग्नाचा दिवस कुटुंब आणि पाहुण्यांसाठी खरोखर आनंददायी असतो. आनंदाच्या प्रसंगी केवळ कुटुंबातील सदस्यच नाही तर मित्रमंडळी देखील पार्टीत सहभागी होतात. कोणत्याही लग्नात डान्स नसेल तर मजा येत नाही, असं म्हटलं जातं. लग्नात मोकळेपणाने डान्स करायला सर्वांनाच आवडतं. भारतात दररोज शेकडो विवाहसोहळे होतात आणि सोशल मीडियावर याचे निरनिराळे व्हिडिओ व्हायरल (Indian Wedding Videos) होत राहततात. सध्या मात्र लग्नातील एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. या लग्नादरम्यानच नाचणारे नातेवाईक एकमेकांशी भिडल्याचं पाहायला मिळतं (Fight Between Guest During Wedding Function). Shocking Video! लग्न होताच नवरा-नवरीने स्वतःला पेटवून घेतलं; पाहुणे मात्र पाहून हसू लागले सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये दिसतं की, लग्नाच्या निमित्ताने स्टेजवर नवरी आणि नवरदेव बसलेले आहेत आणि समोरील डीजे फ्लोअरवर नातेवाईक उत्साहात नाचत आहेत. त्यानंतर अशी काही घटना घडते की, प्रकरण थेट हाणामारीपर्यंत पोहोचतं. डान्स करतानाच दोन तरुण एकमेकांशी भिडल्याचं पाहायला मिळतं. काही युवक डान्स फ्लोअरवर नाचत असतानाच ही घटना घडली. घटनेचा व्हिडिओ YouTube वर शेअर करण्यात आला असून आतापर्यंत 2.2 मिलियनहून अधिकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. व्हिडिओमध्ये दिसतं की या लग्नातील बहुतेक पाहुणे एकतर डान्स करत आहेत किंवा काहीतरी खात-पित आहेत. यादरम्यान एक जोडपं सोबत डान्स करण्यासाठी फ्लोअरवर येतं. मात्र या युवकाने महिलेसोबत डान्स करण्यासाठी तिचा हात पकडला आणि तिला ओढून डान्स फ्लोअरवर आणलं. यादरम्यान त्याच्याकडून एक चूक झाली. ती म्हणजे या नादात त्याचा धक्का शेजारी उभा असलेल्या एका दुसऱ्या युवकाला लागला. बापरे! वरात आहे की त्सुनामी; जेवणाऱ्या काऊंटरच्या दिशेने धावत सुटले पाहुणे, Video Viral यानंतर धक्का लागल्याने हा युवक भडकला आणि स्टेजवर आलेल्या व्यक्तीला जोरात पकडून उचलू लागला. काहीच वेळात तो वाद घालू लागला आणि मारहाणही करू लागला. भांडण सुरू होताच लगेचच डिजे बंद करण्यात आला आणि सगळे हे प्रकरण शांत करण्यासाठी प्रयत्न करू लागले. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Shocking video viral, Wedding video

    पुढील बातम्या