Home /News /viral /

Shocking Video! लग्न होताच नवरा-नवरीने स्वतःला पेटवून घेतलं; पाहुणे मात्र पाहून हसू लागले

Shocking Video! लग्न होताच नवरा-नवरीने स्वतःला पेटवून घेतलं; पाहुणे मात्र पाहून हसू लागले

लग्न होताच दोघांनी एकमेकांचा हात हातात धरला, चेहऱ्यावर हसू आणत त्यांनी स्वतःला आगीच्या स्वाधीन केलं.

  लंडन, 12 मे : लग्नाचे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात (Wedding video). काही इमोशनल काही मजेशीर असतात. पण सध्या लग्नाचा असा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. जो पाहून सर्वजण शॉक झाले आहेत. लग्नात नवरा-नवरीने स्वतःलाच आग लावून पेटवून घेतलं आहे. पण लग्नात आलेले पाहुणेही फक्त पाहत राहिले (Bride groom fire). लग्नात आग लागल्याची दुर्घटना घडल्याची प्रकरणं तुम्हाला माहिती असतील पण या कपलने मुद्दामहून स्वतःला पेटवलं आहे. व्हिडीओत पाहू शकता नवरा-नवरी हातात हात घालून उभे आहेत. सुरुवातीला नवरीबाईच्या हातातील बुकेला आग लावली जाते. त्यानंतर कपलच्या पाठीमागे आग लावली जाते. आश्चर्य म्हणजे हे कपल तशाच अवस्थेत एकमेकांचा हात हातात धरतं आणि चेहऱ्यावर हसू आणत एकमेकांसोबत पावलं टाकताना दिसतं. चालचा चालता दोघंही आपला हात वर करून ते लग्नात आलेल्या पाहुण्यांना बाय बायही करतात. धक्कादायक म्हणजे नवरा-नवरी आगीच्या विळख्यात असताना पाहुणेही त्यांच्याकडे पाहत हसताना दिसतात. कुणीही त्यांच्याजवळ येत नाही. असा हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसला असेल. हे नेमकं काय चाललं आहे, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. हे वाचा - ना Baby Bump, ना Pregnancy Symptoms; 18 वर्षांच्या तरुणीच्या अचानक पोटात दुखू लागलं आणि जन्माला आलं बाळ तर आता या कपलने स्वतःला कोणत्या रागातून किंवा दुःखातून पेटवून घेतलेलं नाही. तर ही त्यांची एक हौस होती. आपलं लग्न हटके, अविस्मरणीय असावं असं बहुतेक कपलला वाटतं. त्यासाठी असते ती ग्रँड एंट्री. किती तरी कपलच्या ग्रँड एंट्री तुम्ही पाहिल्या असतील. पण या कपलने आपली एक्झिटही सर्वांच्या लक्षात राहिल अशी केली आहे. त्यांना फुलांच्या वर्षावाची सामान्य एक्झिट नको होती. त्यामुळे त्यांनी ही आयडिया केली. त्यांनी आपल्या पाठीवर आग लावून घेतली आणि तिथून एक्झिट घेतली. त्यांनी लग्नात आलेल्या पाहुण्यांचा निरोप घेतला.
  दोघांनी हंगर गेम्स नावाच्या फिल्ममधील सीन रिक्रिएट करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी सुरक्षेची पुरेपूर काळजी घेतली होती.  कपलने फायर प्रुफ वेडिंग ड्रेस घातला होता. सोबत शरीरावर त्यांनी अँटी बर्न जेल लावलं होतं.  शेवटी दोघंही फायर  एक्सटीन्गुइशेरजवळ जातात आणि आपल्या पाठीवरील आग विझवून घेतात. हे वाचा - ना Baby Bump, ना Pregnancy Symptoms; 18 वर्षांच्या तरुणीच्या अचानक पोटात दुखू लागलं आणि जन्माला आलं बाळ हे दोघंही प्रोफेशनल स्टंट्समन आहेत आणि दोघांनीही तज्ज्ञांच्या उपस्थितीत हा स्टंट केला होता.  आपल्या या हटके एक्झिटबाबत कपलने सांगितलं की, हे त्यांच्यासाठी खास आहे. पण इतर कुणीच असं करण्याची डेअरिंग करू नये.
  Published by:Priya Lad
  First published:

  Tags: Viral, Viral videos, Wedding, Wedding video

  पुढील बातम्या