नवी दिल्ली 12 ऑक्टोबर : अनेक लोकांनी अॅडवेंचर गेम्स (Adventure Games) खेळायला भरपूर आवडतं. अशा खेळांमुळे शरीरात एक वेगळीच उर्जा निर्माण होते आणि उत्साहही भरपूर वाढतो. मात्र, अनेकदा हेच खेळ काहींच्या आयुष्याचा शेवटही करतात. अशा खेळांदरम्यान मृत्यू झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल (Shocking Video Viral) होत आहे. यात दिसतं, की एक महिला अॅडवेंचर खेळात भाग घेते, मात्र हा तिच्या आयुष्यातील शेवटचा खेळ ठरतो (Woman Died During Bungee Jumping).
एका पायावर वाऱ्याच्या वेगाने चालवतो सायकल; VIDEO पाहून अपंग तरुणाला कराल सॅल्युट
कजाकिस्तानमध्ये (Kazakhstan) राहणारी ३३ वर्षीय येवजीनिया लिओन्तिया तीन मुलांची आई होती. दोन तिची मुलं होती तर तिसरा तिच्या नातेवाईकांचा मुलगा होता. ज्याचा सांभाल तिच करायची. येवजीनिया आपल्या पती आणि मित्रांसोबत कारागांडा शहरातील एका हॉटेलमध्ये गेली होती. याच्या छतावर बंजी जंपिंग (Bungee Jumping) अॅडवेंचर गेम खेळली जाते. यात व्यक्तीच्या कमरेला रस्सी बांधली जाते आणि यानंतर या व्यक्तीला उंचावरून खाली सोडलं जातं. यानंतर व्यक्ती हवेतच या रस्सीच्या सहाय्याने लटकत राहातो. येवजीनियाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात ती उंचावर उभी असून बंजी जंपिंग करताना दिसते. मात्र, तिच्यासोबत मोठी दुर्घटना घडते.
मिळालेल्या माहितीनुसार, महिलेचा पती तिचा व्हिडिओ शूट करत होता. महिला छतावर दोरी बांधून उभा होती. अचानक तिनं खाली उडी घेतली मात्र दोरी व्यवस्थित नसल्यानं हवेत लटकण्याऐवजी ती थेट जमिनीवर कोसळली आणि एका भिंतीला जाऊन धडकली. खाली उपस्थित असलेल्या लोकांनी तिला वाचवण्याचा भरपूर प्रयत्न केला. ती जखमी झालेली होती. लगेचच तिला रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं मात्र सर्जरीदरम्यानच तिचा मृत्यू झाला.
अद्भुत! अंगावर पाणी पडताच रंग बदलतो हा मासा; कधीच पाहिला नसेल असा VIDEO
या महिलेनं याआधीही अनेकदा बंजी जंपिंग केली असल्याचं समोर आलं आहे. या घटनेनंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. हत्येच्या अँगलनंही पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. बंजी जंपिंगच्या ऑर्गनायजर्सविरोधात केस दाखल करण्यात आली आहे. पोलिसांचं असं म्हणणं आहे, की ही रस्सी कमजोर होती ज्याकडे दुर्लक्ष केलं गेलं. उडी घेणाऱ्या व्यक्तीला दोन दोऱ्यांनी बांधलेलं असतं, मात्र यात एक दोरी तुटल्यानं ही मोठी दुर्घटना घडली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Accident, Shocking video viral