Home /News /viral /

एका पायावर वाऱ्याच्या वेगाने चालवतो सायकल; अपंग तरुणाचा VIDEO पाहून तुम्हीही कराल सॅल्युट

एका पायावर वाऱ्याच्या वेगाने चालवतो सायकल; अपंग तरुणाचा VIDEO पाहून तुम्हीही कराल सॅल्युट

एक पाय नाही म्हणून तो खचला नाही, हिंमत हरला नाही.

    लखनऊ, 11 ऑक्टोबर : आपण साधं पडलो आणि आपल्याला तात्पुरती दुखापत झाली तरी आपण अगदी अंथरूणालाच खिळून बसतो. म्हणजे आपल्याने आता काहीच होणार नाही, असंच आपल्याला वाटतं. विचार करा, ज्यांनी आपला एखादा अवयव कायमचा गमावला असेल, त्यांचं काय? पण इच्छा आणि जिद्द असेल तर काहीही अशक्य नाही. इच्छा तिथे मार्ग असतोच हे एका दिव्यांगाने दाखवून दिलं आहे. सोशल मीडियावर एका दिव्यांगाचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ज्याला एक पाय नाही आहे पण एकाच पायावर तो सायकल चालवताना दिसतो आहे. एका पायानेही हा तरुण अगदी वाऱ्याच्या वेगाने सायकल पळवतो आहे. रस्त्यावरून जाणारे इतर प्रवासीही त्याला पाहून थक्क झाले आणि त्यांनी या व्यक्तीचा व्हिडीओ काढला. हा व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. एका हातात काठी घेऊन ही व्यक्ती सायकल चालवते आहे. हे वाचा - अद्भुत! अंगावर पाणी पडताच रंग बदलतो हा मासा; कधीच पाहिला नसेल असा VIDEO सायकल चालवणं म्हणजे त्याचे दोन्ही पँडल मारणं गरजेचं आहे. आता या व्यक्तीला एकच पाय आहे, ती सायकल कशी काय चालवेल. या व्यक्तीने आपला एक पाय सायकलच्या एका पँडलवर ठेवला आहे आणि दुसरा पँडल मारण्यासाठी त्याने काठी वापरली आहे. एका हातात काठी घेऊन त्याने दुसरा पँडल फिरवते आहे. अशा पद्धतीने ही व्यक्ती सायकल चालवते आहे. जरा विचार करा एका पायावर तुम्ही काय करू शकता. किमान एक पाय दुमडून फक्त एका पायावर थोडा वेळ तुम्हाला एकच पाय आहे, असं समजून चाला. बघा तुम्हाला काय काय करणं शक्य होतं आहे. आता या माणसाप्रमाणे सायकलही चालवून पाहा. त्यावरूनच ही व्यक्ती किती मेहनत घेते आहे, याची कल्पना तुम्हाला येईल. व्हिडीओतील संवाद ऐकून हा व्हिडीओ उत्तर प्रदेशचा असल्याचं स्पष्ट होतं. ही व्यक्ती कामासाठी दररोज सायकलवरून प्रवास करते. हे वाचा - दोन बायकांच्या भांडणात तिसऱ्यालाच खावा लागला मार; VIDEO पाहून पोट धरून हसाल आएएस अधिकारी अवनीश शरण यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. कधीच हार मानू नका, असं कॅप्शन त्यांनी या व्हिडीओला दिलं आहे. हा व्हिडीओ पाहून त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. हा तरुण म्हणजे अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला आहे. त्याच्या हिमतीला, जिद्दीला सर्वांनी सॅल्युट केलं आहे. त्याचं सोशल मीडियावर खूप कौतुक केलं जातं आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Handicapped legs, Viral, Viral videos

    पुढील बातम्या