Home /News /viral /

अद्भुत! अंगावर पाणी पडताच रंग बदलतो हा मासा; कधीच पाहिला नसेल असा VIDEO

अद्भुत! अंगावर पाणी पडताच रंग बदलतो हा मासा; कधीच पाहिला नसेल असा VIDEO

रंग बदलणारा सरडा पाहिला आहे, मासा पाहिलात का?

    मुंबई, 11 ऑक्टोबर : रंग बदलणारा प्राणी कोणता विचारला तर साहजिकच आपण सरडा म्हणतो. रंग बदलणारा सरडा आपणा सर्वांना माहितीच आहे. पण रंग बदलणारा मासा (Fish video) कधी पाहिला आहे का? (Fish changing colour video) रंगबेरंगी मासे पाहिले असतील पण रंग बदलणारा मासा नक्कीच नाही (Changing colour fish video). अगदी सरड्यासारखा रंग बदलणारा हा मासा. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. रंग बदलणारा मासा पाहून तुम्हीही आश्चर्यचकीत व्हाल. मासासुद्धा सरड्याप्रमाणे रंग बदलू शकतो यावर तुम्हाला व्हिडीओ पाहून स्वतःच्या डोळ्यांवरही विश्वास बसणार नाही. हा मासा अगदी सेकंद सेकंदाने रंग बदलतो आहे. सरड्यापेक्षाही कमी वेळेत हा मासा आपला रंग बदलताना दिसतो. अगदी मिनिटभरातच त्याचे वेगवेगळे रंग दिसतात. हे वाचा - WOW! लखाखणाऱ्या कोळ्याचं कलरफुल जाळं; कधी पाहिलंय का तुम्ही? खरंतर हा मासा नाही तर मासा आणि सरडा या दोघांसारखा दिसणारा एक प्राणी आहे. पण त्याला पाहताच तो सुरुवातीला मासाच आहे, असंच वाटतं.  व्हिडीओत पाहू शकता एका टबमध्ये पाण्यात हे दोन प्राणी आहेत. वरून एक व्यक्ती या टबमध्ये पाणी ओतते आहे. सामान्यपणे जेव्हा कोणत्याही प्राण्याच्या अंगावर असं पाणी पडतं, म्हणजे त्यांना तो एकप्रकारे धोका वाटतो आणि मग ते तिथून पळतात. हे दोन्ही प्राणीही तसेच पळताना दिसत आहे. पण त्यावेळी एका माशाचा मात्र रंग बदलतो आहे. जेव्हा त्याच्या अंगावर पाणी पडतं तेव्हा तो आपले रंगही बदलतो.
    लाल, हिरवा, पिवळा, निळा, गुलाबी, जांभळा असे किती तरी रंग या प्राण्याचे दिसतात. आता हा प्राणी खरंच असं रंग बदलतो का? व्हिडीओ पाहून सर्वजण हैराण झाले आहेत. काही नेटिझन्सच्या मते हे एडिटिंग आहे, प्रत्यक्षात हा प्राणी रंग नाही बदलत आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Fish, Viral, Viral videos

    पुढील बातम्या