Home /News /viral /

अजबच! माणूस नव्हे तर झाडाच्या प्रेमात पडली महिला; अखेर घेतला मोठा निर्णय

अजबच! माणूस नव्हे तर झाडाच्या प्रेमात पडली महिला; अखेर घेतला मोठा निर्णय

केट कनिंघम नावाच्या महिलेनं 3 वर्षांपूर्वी झाडासोबत लग्नगाठ बांधली. आता झाडासोबतच्या आपल्या वैवाहिक आयुष्यात आपण भरपूर आनंदी असल्याचं या महिलेनं सांगितलं.

    नवी दिल्ली 19 डिसेंबर : लग्न हा कोणाच्याही आयुष्यातील अतिशय मोठा निर्णय असतो. तुम्ही निवडत असलेला पार्टनर संपूर्ण आयुष्य त्याच्यासोबत काढण्यासाठी योग्य आहे की नाही याचीही खात्री करून घ्यावी लागते. एका ब्रिटिश महिलेनं मात्र स्वतःसाठी अतिशय वेगळा पार्टनर निवडला (Unique Weddings). तिने माणूस सोडून चक्क झाडासोबत लग्नगाठ बांधली (Woman Married with Tree). या महिलेचं असं म्हणणं आहे की तिला या झाडातंच आपला आयुष्यभराचा जोडीदार (Life Partner) दिसला. स्क्रीनवर पक्षी दिसताच मांजराने TV वर घेतली उडी अन्...; VIDEO पाहून खळखळून हसाल केट कनिंघम नावाच्या महिलेनं 3 वर्षांपूर्वी झाडासोबत लग्नगाठ बांधली. आता झाडासोबतच्या आपल्या वैवाहिक आयुष्यात आपण भरपूर आनंदी असल्याचं या महिलेनं सांगितलं. तिने सांगितलं की माझं माझ्या पतीवर खूप प्रेम आहे आणि सध्या आमचं आयुष्य अतिशय परफेक्ट आहे. अनेक लोक तिला लग्नाबाबत प्रश्न करतात, मात्र या सर्वांना तिला हे सांगायचं आहे की तिचं आयुष्य खूप चांगलं चाललं आहे. ग्रह-दोष मिटवण्यासाठी झाडासोबत लग्न केल्याच्या अनेक घटना तुम्ही पाहिल्या असतील. मात्र या महिलेबाबत असं नाही. तिला या झाडातच आपला जोडीदार दिसला आणि साल 2019 मध्ये तिने अतिशय उत्साहात झाडासोबत लग्न केलं. आठवड्यात पाचवेळा ती आपल्या पतीला भेटायला जाते. आता ख्रिसमसमुळे तिने आपल्या पार्टनरला भरपूर सजवलं आहे. 37 वर्षाच्या केट हिने रिमॉर्स वॅली काउंटी पार्कमध्ये या झाडासोबत लग्न केलं होतं. यानंतर तिने आपलं आडनाव बदलून मिसेस एल्डर असं केलं होतं.

    आई करत होती दुसरं लग्न; मुलीनं फोटो शेअर करत दिलं असं कॅप्शन की पाणावतील डोळे

    जेव्हा ती एखाद्याला विशिंग कार्ड पाठवते तेव्हा त्यावर मिस्टर अॅण्ड मिसेस एल्डर असं लिहिलेलं असतं. आपण तिसऱ्यांदा ख्रिसमस सोबत करत असल्याचं केटने सांगितलं. केटचं असं म्हणणं आहे की विशेषतः ख्रिसमसच्या वेळी तिचा वृक्ष पती अधिक आकर्षक दिसतो. पार्कमध्ये सतत येणं सुरू असतानाच या झाडावर आपल्याला प्रेम झाल्याचं त्यांनी सांगितलं. याच प्रेमाला त्यांनी लग्नाच्या नात्यात बदललं आणि आता अगदी आनंदात आपलं वैवाहित आयुष्य जगत आहे.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Tree, Wedding

    पुढील बातम्या