मराठी बातम्या /बातम्या /Viral /

स्क्रीनवर पक्षी दिसताच शिकारीसाठी मांजराने TV वर घेतली उडी अन्...; VIDEO पाहून पोट धरून हसाल

स्क्रीनवर पक्षी दिसताच शिकारीसाठी मांजराने TV वर घेतली उडी अन्...; VIDEO पाहून पोट धरून हसाल

Funny Cat Video: एक मांजर पक्षाची शिकार करण्यासाठी काहीही विचार न करता उंचावरुन उडी घेते आणि पक्षावर हल्ला करते. मात्र, यानंतर ती धाडकन जमिनीवर कोसळते

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 19 डिसेंबर : सोशल मीडियावर (Social Media) प्राणी आणि पक्षांचे व्हिडिओ सतत व्हायरल (Viral Videos of Birds and Animals) होत राहतात. यातील अनेक व्हिडिओ तर असे असतात जे पाहून आपल्याला आपल्या डोळ्यांवरच विश्वास बसत नाही. सध्या असाच एक नवा व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही हैराण व्हाल. जंगलात राहणारी मांजर असो किंवा घरातील पाळीव मांजर, मांजरी खूप चांगल्या शिकारी असतात, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. अशाच एका मांजरीचा व्हिडिओ (Funny Video of Cat) सध्या समोर आला आहे.

जगातील सर्वात सुंदर 'मोदी म्हैस'; किंमत जाणून व्हाल थक्क, रंजक आहे नावामागची कथा

मांजरीचा हा ट्विटरवरील व्हिडिओ नेटकऱ्यांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे. यात दिसतं की एक मांजर पक्षाची शिकार करण्यासाठी काहीही विचार न करता उंचावरुन उडी घेते आणि पक्षावर हल्ला करते. मात्र, यानंतर ती धाडकन जमिनीवर कोसळते. व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक मांजर आणि कुत्रा टीव्ही बघत आहेत. टीव्ही पाहत असतानाच स्क्रीनवर अचानक एक पक्षी दिसतो. मांजर या पक्षाला खरा पक्षी समजण्याची चुक करतं. पक्षाची शिकार करण्यासाठी मांजर जोराची उडी घेतं आणि धाडकन जमिनीवर कोसळतं. हा व्हिडिओ पाहून सगळेच खळखळून हसत आहेत.

हा मजेशीर व्हिडिओ ट्विटरवर @buitengebieden_ नावाच्या पेजवरुन शेअर केला गेला आहे. बातमी देईपर्यंत हा व्हिडिओ 2.5 लाखहून अधिकांनी पाहिला आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी यावर मजेशीर कमेंटही केल्या आहेत. मांजरीच्या फजितीची व्हिडिओ अनेकांच्या पसंतीस उतरत आहे.

उंदराला मरणातून वाचवण्यासाठी कावळ्याची धडपड; कसा वाचवला जीव पाहा VIDEO

एका यूजरने यावर प्रतिक्रिया देत लिहिलं, हे दृश्य खरंच मजेशीर आहे. हे पाहून मला हसू आवरत नाहीये. दुसऱ्या एका यूजरने लिहिलं, यामुळेच माझी मांजर टीव्ही न पाहता टॅबलेट बघते. याशिवाय इतरही अनेकांनी या व्हिडिओवर निरनिराळ्या कमेंट केल्या आहेत.

First published:

Tags: Cat, Funny video