मराठी बातम्या /बातम्या /Viral /

आई करत होती दुसरं लग्न; मुलीनं फोटो शेअर करत दिलं असं कॅप्शन की पाणावले सगळ्यांचे डोळे

आई करत होती दुसरं लग्न; मुलीनं फोटो शेअर करत दिलं असं कॅप्शन की पाणावले सगळ्यांचे डोळे

ही मुलगी इतकी उत्साही आहे की तिने आपल्या आईच्या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ (Wedding Photo and Videos) सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. या पोस्टच्या माध्यमातून तिने आपला आनंदही व्यक्त केला आहे

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 19 डिसेंबर : सोशल मीडियावर (Social Media) सध्या एक तरुणीचं चांगलंच कौतुक होत आहे. या मुलीची आई दुसरं लग्न करत आहे (Second Marriage of Mother). यामुळे ही मुलगी इतकी उत्साही आहे की तिने आपल्या आईच्या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ (Wedding Photo and Videos) सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. या पोस्टच्या माध्यमातून तिने आपला आनंदही व्यक्त केला आहे. या मुलीने आपल्या आईच्या दुसऱ्या लग्नाबद्दलही लोकांना सांगितलं आहे.

जगातील सर्वात सुंदर 'मोदी म्हैस'; किंमत जाणून व्हाल थक्क, रंजक आहे नावामागची कथा

ट्विटरवर @alphaw1fe नावाच्या यूजरने आपल्या आईच्या लग्नातील फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. हे पाहून तुम्हालाही आनंद होईल. या मुलीची पोस्ट पाहून तुम्हीही तिचं कौतुक कराल.

पहिल्या ट्विटमध्ये तिने आपल्या आईच्या मेहंदीचे फोटो शेअर केले आहेत. यात तिची आई मेहंदी लावण्यासाठी बसल्याचं दिसतं.

या फोटोला कॅप्शन देत तिनं लिहिलं, आईचं लग्न होत आहे आणि मला विश्वास बसत नाहीये.

यानंतर या तरुणीने जे ट्विट केलं त्यात तिची आई लग्नासाठी तयार होताना दिसते. याला कॅप्शन देत तिने लिहिलं, ती सुंदर दिसत नाही का? यानंतर तिने आपल्या आईच्या लग्नातील झलक शेअर केली आहे. हे फोटो आणि व्हिडिओ पाहून तुमचे डोळेही पाणावतील.

VIDEO - एक पाय गमावला पण खचला नाही! दिव्यांगाने वाऱ्याच्या वेगाने पळवली सायकल

या मुलीने पोस्ट केलेले सर्व फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या पोस्टला 20 हजारहून अधिका लाईक मिळाले आहेत. अनेकांनी या महिलेला वैवाहिक आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. या मुलीने कमेंटमध्ये हा खुलासादेखील केला आहे, की तिची आई आतापर्यंत एका चुकीच्या लग्नाच्या नात्यात अडकली होती. अखेर याचा सुखद शेवट झाला आहे.

First published:

Tags: Marriage, Wedding