जाहिरात
मराठी बातम्या / Viral / आता काय म्हणावं हिला! म्हणे, 'नवरा नको, स्मार्टफोन हवा'; मोबाईलवेड्या पत्नीने शेवटी पतीला....

आता काय म्हणावं हिला! म्हणे, 'नवरा नको, स्मार्टफोन हवा'; मोबाईलवेड्या पत्नीने शेवटी पतीला....

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

स्मार्टफोनच्या नादात पत्नीने पतीसोबत जे केलं ते पाहून काऊन्सरलही हैराण झाली.

  • -MIN READ Uttar Pradesh
  • Last Updated :

लखनऊ, 04 मार्च :  मोबाईल हा आता कित्येकांच्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग बनला आहे. स्मार्टफोनच्या नादात लोक काय काय करत नाही आहेत. असंच एक धक्कादायक प्रकरण चर्चेत आलं आहे. एका महिलेचं मोबाईलवर इतकं प्रेम आहे, ही त्याच्यासमोर तिच्या नवऱ्याचं प्रेमही फिक वाटतं. मोबाईलवेड्या बायकोने मोबाईलच्या नादात मोबाईलसाठी नवऱ्यासोबत असं काही केलं की सर्वांनाच धक्काच बसला आहे. उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमधील हे धक्कादायक प्रकरण आहे. गाझियाबादच्या लोनीमधील दाम्पत्यामध्ये मोबाईलमुळे दुरावा आला आहे. अखेर या दाम्पत्याचं प्रकरण कौटुंबिक सल्ला केंद्रात पोहोचलं आहे. तिथं मोबाईलसाठी बायकोने नवऱ्याबाबत जो निर्णय घेतला तो ऐकून काऊन्सरलही हैराण झाले. नवऱ्याने सांगितलं, बायको दिवसभर मोबाईलवर असते. घरातील प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टी ती आपली बहीण आणि भावोजींना फोन करू सांगते. बहिणीसोबत नवऱ्याबाबत वाईट बोलत राहते. तिची बहीणही तिच्या नवऱ्याबाबत बरंच काही बोलते पण ती बिलकुल विरोध करत नाही. पत्नीचं मोबाईल वेड पाहून शेवटी त्याने तिला स्मार्टफोनऐवजी कीपॅड फोन देण्याबाबत सांगितलं. तेव्हा पत्नी रागात त्याला सोडून माहेरी निघून गेली. VIDEO - हौशेपोटी केली 4 लग्न; बायकांनी अशी वाट लावली की हात जोडून जीवाची भीक मागू लागला नवरा नवरा-बायकोमध्ये मोबाईलवरून सुरू झालेलं भांडण कौटुंबिक सल्ला केंद्रात पोहोचलं. कौटुंबिक सल्ला केंद्राच्या प्रभारींनी सांगितलं, महिलेला समजावण्याचा खूप प्रयत्न करण्यात आला. पण ती काहीच ऐकायला, मानायला तरायर नाही. स्मार्टफोनसाठी ती काहीही करायला तयार आहे. तिने आपल्या भावांचंही ऐकलं नाही.  तक्रारदार पतीने असा व्हिडीओही दाखवला ज्यात त्याची जिद्दी पत्नी त्याला मारहाण करते आहे.

News18लोकमत
News18लोकमत

पत्नी म्हणाली, काही झालं तरी ती स्मार्टफोनला सोडणार नाही. नवऱ्यापेक्षा स्मार्टफोन जास्त प्रिय आहे. तिने स्मार्टफोनसाठी नवऱ्याला सोडण्याचाही तयारी दाखवली.  ज्यामुळे काऊन्सरलही हैराण झाली. दूर राहूनही तुम्ही एकमेकांना करू शकता Lip to Lip kiss; कसं ते पाहा ही सॉलिड टेक्निक सध्या या दाम्पत्याला कसंबसं समजवावून घरी पाठवण्यात आलं आहे आणि पुढील तारीख देण्यात आली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात