जाहिरात
मराठी बातम्या / Viral / VIDEO - हौशेपोटी केली 4 लग्न; बायकांनी अशी वाट लावली की हात जोडून जीवाची भीक मागू लागला नवरा

VIDEO - हौशेपोटी केली 4 लग्न; बायकांनी अशी वाट लावली की हात जोडून जीवाची भीक मागू लागला नवरा

पत्नींनी केली पतीची धुलाई

पत्नींनी केली पतीची धुलाई

चार लग्न करणाऱ्याला नवऱ्यासोबत बायकांनी असं काही केलं की तो आयुष्यभर कधीच विसरणार नाही.

  • -MIN READ Uttar Pradesh
  • Last Updated :

लखनऊ, 26 फेब्रुवारी : दोन बायका फजिती ऐका… हे तुम्ही फिल्म किंवा रिअल लाइफमध्येही पाहिलंच असेल. एका व्यक्तीची तर फक्त दोन बायकावरही हौस मिटली नाही. त्याने चार लग्न केली. त्यानंतर त्याच्या पत्नींनी अशी वाट लावली की तो त्यांच्याकडे हात जोडून जिवाची भीक मागू लागला. उत्तर प्रदेशमधील या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. वाराणसीच्या पठानीटोलामध्ये राहणारा फजलुर्रहमान ज्याने एकूण चार लग्न केली आहे. त्याची पहिली पत्नी शाहगंज, दुसरी कानपूर आणि तिसरी आझमगढमध्ये राहते. त्याने चौथं लग्नही केलं पण त्याच्या चौथ्या लग्नाबाबत त्याच्या पहिल्या तीन बायकांना काहीच माहिती नव्हती. जेव्हा त्यांना याबाबत माहिती झाली तेव्हा सर्व्सांमोर त्यांनी त्याची धुलाई केली.  जौनपूर जिल्ह्यातील शाहगंज परिसरातील ही घटना आहे. त्याच्या तिन्ही बायकांना मुलं आहेत. त्याच्या पत्नींच्या आरोपानुसार मुलं झाल्यानंतर त्याने आपल्याला सोडून दिलं. त्याने चौथं लग्न केलं आणि आता तो चौथ्या बायकोसोबत राहतो आहे. नवरा-बायकोचं भांडण आणि काही क्षणात दोघांचाही ‘खेळ खल्लास’; असा शेवट झाला की… पाहा VIDEO त्याची पहिली पत्नी म्हणाली, की फजलुर्रहमानपासून तिला एक मुलगा आहे, जो 13 वर्षांचा आहे. पण तो आपल्याला त्याला भेटू देत नाही.  त्यामुळे तिने कोर्टात धाव घेतली. आपल्याला मुलाला भेटू देण्याची याचिका तिने केली. त्यानंतर कोर्टाने मुलाला भेटण्याची परवानगी दिली. पण तरी तिच्या नवऱ्याने तिला मुलाला भेटू दिलं नाही.

News18लोकमत
News18लोकमत

याप्रकरणी कोर्टात पुन्हा सुनावणी होणार होती. जिथं त्याच्या तिन्ही पत्नी पोहोचल्या. तेव्हा त्याच्या चौथ्या लग्नाबाबतही समजलं. त्यानंतर तिघींचा पारा चढला आणि तिघींनी मिळून त्याची चांगलीच धुलाई केली. धक्कादायक! रस्त्यावरील भटक्या Puppy ला नवऱ्याने घरी आणलं, बायकोचा मृत्यू; असं काय घडलं? व्हिडीओत तुम्ही पाहू शकता व्यक्तीला त्याची पत्नी चांगलीच चोपते आहे. व्यक्ती हात जोडून आपल्या जीवाची भीक मागताना दिसतो आहे. आपल्याला मारू नका, हवं तर पोलिसांकडे द्या, असंही तो बोलताना दिसतो आहे.

जाहिरात

पण त्याची बायको काहीच ऐकत नाही. ती त्याला आधी कानशिलात सटासट लगावते आणि नंतर जमिनीवर आडवं करून मारते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात