कॅनबेरा, 28 जानेवारी : प्रत्येक नात्याचं एक महत्त्व, एक मर्यादा असते. पण काही लोक ही मर्यादा ओलांडतात. असंच केलं ते एका बापलेकीनं. बाप लेकी एकमेकांच्या प्रेमात पडले. नवऱ्याला सोडून तरुणीचं वडिलांसोबत अफेअर सुरू झालं. सख्ख्या बापाने आपल्या पोटच्या लेकीसोबतच शारीरिक संबंध ठेवले. ती प्रेग्नंटही झाली. पण त्यांच्या या अशा नात्यातून असं मूल जन्माला आलं की...
ऑस्ट्रेलियातील ही धक्कादायक घटना आहे. जॉन डिव्हसची मुलगी जेनी जेव्हा मोठी होत होती, तेव्हा त्याने तसा तिच्यासोबत फार वेळ घालवला नव्हता. 2000 साली जेनी जॉन आणि त्याची तिसरी पत्नी डोरोथीला भेटायला दक्षिण ऑस्ट्रेलियाच्या पोर्ट पीरमध्ये त्यांच्या घरी गेली. तेव्हा ती 31 वर्षांची होती. तिचं लग्न झालं होतं आणि दोन मुलंही होती. पण तरी बापलेक असलेल्या जेनी आणि जॉनच एकमेकांसोबत अफेअर सुरू झालं. त्यांनी शारीरिक संबंधही ठेवले.
हे वाचा - BF समजून तरुणीने वडिलांनाच...; झोपेत असं काही करून बसली की झोप कायमची उडाली; VIDEO VIRAL
जेनी म्हणाली, तिथं काही दिवस राहिल्यानंतर माझ्या भावना बदलत आहेत, असं मला जाणवलं. मी त्यांना एका पुरुषाच्या रूपात एका, व्यक्तीच्या रूपात अशा व्यक्तीच्या रूपात जो माझ्यावर प्रेम करतो, असं पाहू लागले. तो माझी काळजी घेत होता.
पण जॉन आणि जेनी त्यांनी काही चुकीचं केलं हे मानायला ते तयारच नाही. दोघांनीही आपल्या पार्टनरला सोडलं होतं. जॉनची पत्नी डोरोथीनंऑस्ट्रेलियान असोसिएटेड प्रेसला सांगितलं की, तो मला म्हणाला हे त्याचं आतापर्यंतचं सर्वात चांगलं सेक्स होतं जेनी म्हणाली, जॉन आणि मी एकमेकांच्या संमतीने या नात्यात आलो. आम्ही एकमेकांना नुकसान पोहोचवलं नाही.
2008 साली दोघांनाही कोर्टाच्या आदेशानंतर वेगळं व्हावं लागलं. कायदा तोडला म्हणून त्यांना दोषी ठरवण्यात आलं. फक्त कोर्टच नव्हे तर त्यांना अशा रिलेशनची आणखी एक शिक्षा मिळाली. त्यांना दोन मुलं झाली. रिपोर्टनुसार त्यातील पहिल्या मुलाला जेनेटिक आजार झाला आणि जन्मानंतर काही दिवसांत त्याचा मृत्यू झाला. त्यांची दुसरी मुलगी निरोगी आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Australia, Couple, Father, Relationship, Viral