मुंबई, 26 जानेवारी : दारूच्या नशेत आणि झोपेत माणूस कधी काय करेल याचा नेम नाही. असंच एका तरुणीसोबत घडलं आहे. तिने झोपेत बॉयफ्रेंड समजून वडिलांसोबत असं काही केलं की तिची झोप कायमची उडाली आहे. झोपेतून जागं होताच तिला जोर का झटका बसला. तरुणाचा हा व्हिडीओही सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. अशा काही लोकांना तुम्ही पाहिलं असेल जे जागं असताना जे काही करू शकत नाही, जागं असताना जे काही करण्याची त्यांची हिंमत नसते. ते झोपेत नकळत करून बसतात. या तरुणीचं तरुणी गलती से मिस्टेक करून बसली आहे. झोपेत बॉयफ्रेंड समजून तिने वडिलांसोबत जे करू नये तेच केलं. जेव्हा तिला जाग आली तेव्हा तिने डोक्यावर हातच मारला. ती झोपेत असं काही करून बसली की तिची झोप कायमची उडाली. हे वाचा - VIDEO - लेकाला निरोप देताना बाबांना आलं गहिवरून; आधी मुलाला गाडीत बसवलं, नंतर त्याच ट्रेनसमोर वडील… आता असं या तरुणीने नेमकं केलं तरी काय हे पाहण्याची, जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हालाही असेल. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता एक तरुणी झोपली आहे. इतक्यात तिची बहीण तिचा फोन घेऊन तिच्याजवळ येते. तिला झोपेतून उठवत तिच्या हातात फोन देते. दीदी तुझ्या बॉयफ्रेंडचा फोन असावा, बोल. असं ती सांगते. तरुणी झोपेतच फोन घेते. फोन कुणाचा आहे ती पाहतही नाही. त्यानंतर ती फोनवर सरळ बोलत सुटते. “हा बेबी मी नंतर बोलते. मी आता झोपली आहे. बाय. लव्ह यू”, असं ती म्हणते. हे वाचा - आता हद्दच झाली राव! भरमंडपातच त्याने नवरीला…, नवरदेवाच्या मित्राच्या विचित्र कृत्याचा VIDEO VIRAL नंतर फोनवरून समोरून आवाज येतो. जो तिच्या बॉयफ्रेंडचा नाही तर वडिलांचा असतो. आवाज ऐकताच तिला जोर का झटका बसतो. पप्पा असं ओरडत ती झोपेतून पटकन उठून बेडवर बसते. नंतर पप्पांना सॉरी सॉरी सॉरी असं म्हणते. “नाही पप्पा चुकून निघालं असं”, असं ती सांगते. आपल्याकडून किती मोठी चूक झाली हे तिला समजतं आणि ती डोक्यावरच हात मारते.
@butterfly_mahi इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडीओ कसा वाटला आणि तुमच्यासोबत किंवा तुमच्या ओळखीच्या व्यक्तीसोबत असं कधी काही घडलं आहे का? ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.