मराठी बातम्या /बातम्या /Viral /VIDEO - लेकाला निरोप देताना बाबांना आलं गहिवरून; आधी मुलाला गाडीत बसवलं, नंतर त्याच ट्रेनसमोर वडील...

VIDEO - लेकाला निरोप देताना बाबांना आलं गहिवरून; आधी मुलाला गाडीत बसवलं, नंतर त्याच ट्रेनसमोर वडील...

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

बापलेकाचा इमोशनल व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Delhi, India

मुंबई, 26 जानेवारी : मुलं कितीही मोठी झाली तरी त्यांच्या आई-वडिलांसाठी ती लहानच असतात. सामान्यपणे आई प्रेमळ आणि वडील कठोर असंच आपल्याला दिसून येतं. पण वरून कठोर असलेला बाप आतून किती हळवा असतो, हे क्वचितच दिसून येतं. अशाच एका हळव्या बाबाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. आपल्या लाडक्या मुलाला रेल्वे स्टेशनवर सोडायला आलेल्या वडिलांनी जे केलं ते पाहून सर्वजण भावुक झाले आहेत.

शिक्षण किंवा कामानिमित्त किती तरी जणांना आपल्या कुटुंबापासून, आईवडिलांपासून दूर राहावं लागतं. असेच एकमेकांपासून दूर राहणाऱ्या बापलेकाच्या या इमोशनल व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. एक वडील आपल्या मुलाला सोडायला रेल्वे स्टेशनवर आले आहेत. त्यांनी आपल्या मुलाला ट्रेनमध्ये बसवलं. ते प्लॅटफॉर्मवर उभे आहेत. मुलगा ट्रेनच्या दरवाजात उभा आहे. थोड्या वेळाने ट्रेन सुरू होते. त्यानंतर वडिलांना गहिवरून आलं. जशी ट्रेन चालू लागते तसे वडिलही...

हे वाचा - आता हद्दच झाली राव! भरमंडपातच त्याने नवरीला..., नवरदेवाच्या मित्राच्या विचित्र कृत्याचा VIDEO VIRAL

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता ट्रेन ज्या दिशेने जाते त्याच दिशेने वडील प्लॅटफॉर्मवरून चालतात. जसजसा ट्रेनचा वेग वाढतो, तसतसा ते आपल्या चालण्याचाही वेग वाढवतात. एकटक मुलाकडे पाहत असतात. तोंडाने काहीच बोलत नाहीत. पण त्यांना काय म्हणायचं आहे ते त्यांच्या चेहऱ्यावर आणि डोळ्यात दिसतं आहे.

आपल्या लाडक्या लेकाला मुलाला निरोप देताना. त्याला आपल्यापासून दूर जाताना पाहून त्यांना किती दुःख होतं आहे हे त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतं आहे. त्यांच्या डोळ्यात पाणीही दिसून येतं आहे. काळजावर दगड ठेवून, जड अंतकरणाने ते आपल्या लाडक्या मुलाला आपल्यापासून दूर जाऊ देत आहेत.

हे वाचा - बापाचं पोटच्या लेकासोबत भयानक कृत्य; VIDEO पाहून नेटिझन्स भडकले, व्यक्त केला संताप

हिती नाही. आर्टिस्ट पवन शर्माने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. "प्रत्येक वेळा जेव्हा माझे बाबा मला रेल्वे स्टेशनवर सोडायला येतात. तेव्हा मी त्यांना दिसेनासा होईपर्यंतते असेच माझ्यासोबत चालतात", असं त्याने या व्हिडीओत सांगितलं आहे.  व्हिडीओ पाहून प्रत्येक जण इमोशनल झाला आहे. काहींनी आपल्याला आपल्या वडिलांची आठवण आल्याचं म्हटलं आहे, एकाने आपले वडीलही आपल्याला असेच सोडायला येतात असं सांगितलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Pawan Sharma (@pwn.sharma)

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर प्रत्येकाला आपल्या वडिलांची आठवण आली असेल. या वडिलांच्या जागी त्यांना आपले वडीलही दिसले असतील. तुम्हाला हा व्हिडीओ पाहून काय वाटलं ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन आम्हाला नक्की सांगा.

First published:

Tags: Father, Parents and child, Son, Viral, Viral videos