मुंबई 25 जानेवारी : आपल्या आजूबाजूला अशा अनेक गोष्टी असतात. ज्याच्या असण्यामागचं, आकारामागचं काहीतरी कारण असतं. रस्त्यावर अशी अनेक वाहने पाहिली असतील, जी वेगवेगळ्या रंगांची असतात. मात्र, तुमच्या हे लक्षात आलंय का की स्कूल बसेसचा रंग फक्त पिवळा असतो. पण असं का? कधी विचार केलाय? यामागील कारण जाणून घ्यायचे असेल तर सर्वप्रथम हे कधी आणि कुठे सुरू झाले हे जाणून घेणे आवश्यक आहे. How Stuff Works या वेबसाइटच्या रिपोर्टनुसार, पिवळ्या रंगाच्या स्कूल बसेस अमेरिकेतून सुरू झाल्या. कोलंबिया विद्यापीठातील शिक्षकांनी मिळून 1930 मध्ये हा निर्णय घेतला. विद्यापीठाचे प्राध्यापक फ्रँक सायर यांनी याबाबत संशोधन सुरू केले. हे ही पाहा : हे ही पाहा : डोंगराळ भागात अचानक हवेत उडू लागली बस, Video पाहून तुम्हीही चक्रावाल शालेय वाहतुकीशी संबंधित संशोधनात त्यांनी न्यूयॉर्क टाइम्सच्या एका मुलाखतीत सांगितले की, त्यावेळी शालेय वाहनांसाठी कोणतेही नियम आणि कायदे नव्हते, त्यानंतर शालेय मुलांच्या सुरक्षिततेसाठी एक बैठक बोलावण्यात आली आणि त्यानंतर निर्णय घेण्यात आला की सर्व बसचा रंग काय असेल. अमेरिकेतून बस बनवणारे उच्चशिक्षित शिक्षक, परिवहन अधिकारी आणि अभियंते या बैठकीत सहभागी झाले होते. बसचा रंग कसा असावा हे सर्वांनी मिळून ठरवले. बैठकीत, भिंतीवर अनेक रंग चिकटवले गेले आणि लोकांना एक निवडण्यास सांगितले. यासगळ्यात पिवळा आणि केशरी रंग जास्त उठून दिसत होता, जो लांबून पाहाणं देखील शक्य होतं, यानंतर शेवटी लोकांनी पिवळा निवडला, त्यानंतर स्कूल बसचा रंग पिवळा झाला. तेव्हापासून लोक हा रंग फॉलो करत आहेत. जाणून घ्या यामागे शास्त्रीय कारण काय आहे? शास्त्रज्ञांच्या मते, पिवळा रंग मानवी डोळ्यांद्वारे अधिक सहजपणे दिसतो. पिवळा रंग दृश्यमानता स्पेक्ट्रमच्या शीर्षस्थानी राहतो. याचे कारण असे की डोळ्यांमध्ये एक पेशी असते ज्याला फोटोरिसेप्टर म्हणतात. त्याला शंकू असेही म्हणतात.
मानवी डोळ्यांमध्ये तीन प्रकारचे शंकू असतात. पहिला रंग शंकू लाल, दुसरा हिरवा आणि तिसरा निळा रंग ओळखतो. यामुळेच डोळ्यांमध्ये पिवळा रंग जास्त दिसतो.