मुंबई 22 जानेवारी : जुगाडाचे अनेक व्हिडीओ आपल्याला सोशल मीडियावर पाहायला मिळतात. तसे पाहाता भारतीयांचा हात जुगाडात कोणीच पकडू शकत नाही. कारण आपण भारतीयांना या सगळ्याची आधीच सवय झालेली असते. हे जुगाड कधीकधी फसतात. पण बऱ्याचदा हे जुगाड आपलं आयुष्य जगण्यासाठी फायद्याचे ठरतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा एका बसचा व्हिडीओ आहे. खरंतर डोंगराळ भागात एका डोंगरावरुन दुसऱ्या डोंगराजवळ जायचं असतं, तेव्हा त्या डोंगराला पूर्णपणे वळसा घालून जावं लागतं. यामध्ये इंधन तर फुकट जातंच शिवाय वेळ देखील वाया जातोच, या डोंगराळ भागातील लोकांना दुसरा काहीच पर्याय नसतो. त्यांच्यासाठी शॉटकर्ट कधीच नसतो. हे ही पाहा : महिलेनं विनाकपडे सुसाट पळवली बाईक आणि… पुढे जो प्रकार घडला तो धक्कादायक पण असं असलं तरी येथील लोकांनी एक शॉर्टकट शोधून काढला आहे. ज्यामध्ये पाहाताना आपल्याला असंच दिसतंय की ही बस हवेत उडतेय. म्हणजे विचार करा रस्त्यावरुन चालनारी बस अचानक हवेत उडू लागली…. हो हे खरं आहे, यावर तुमचा विश्वास बसत नसला तरी हे खरं आहे. पण हा एक जुगाड आहे. या बसला रोपवेला बांधून एका डोंगरावरुन दुसऱ्या डोंगरावर पाठवले जात आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला ते लक्षात येईलच. पण हा जुगाड धोकादायक देखील आहे. कारण जर का ती रोप तुटली तर त्या बससोबत काय होईल हे वेगळं सांगायला नको. हा व्हिडीओ नेपाळमधून समोर आला आहे. ज्यामध्ये डोंगराच्या एका भागावर रोप बंधून ती बसला अडकवून बसला दुसऱ्या बाजूला घेऊन जात आहे. एका यूजरने हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. नेपाळमध्ये सार्वजनिक वाहतूक अशीच आहे, असे या व्हिडीओला कॅप्शन देण्यात आले आहे. जाड केबल आणि जाड दोरीच्या साहाय्याने एक मोठी सार्वजनिक बस रस्ता ओलांडून नेत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. ही बस जेव्हा दुसऱ्या बाजूला जाते तेव्हा या बसच्या मागे दोन लोक उपस्थित होते. पलीकडे बस पोहोचायला अडचण येऊ नये म्हणून ते सगळं पाहत आहेत.
असं सांगितलं जात आहे की आधी इथे रस्ता होता. परंतू तो रस्ता कालांतराने खचला ज्यामुळे वाहतुकीसाठी हा वेगळा मार्ग तेथील लोकांनी अवलंबला. हा मार्ग धोकादायक दिसत असला तरी देखील तो आता तेथील लोकांसाठी रोजच्या जीवनाचा एक भाग झाला आहे. हे ही पाहा : Video Viral: रस्त्यावर क्रिकेट खेळत होते तरुण, अचानक भरधाव बाईक आली आणि… हा जुगाडाचा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना देखील धक्का बसला आहे. लोक यावर वेगवेगळ्या कमेंट्य करत आहेत. तर अनेक लोक या व्हिडीओला लाईक आणि शेअर देखील करत आहेत.