मराठी बातम्या /बातम्या /Viral /खरचं Incognito mode सेफ आहे? ते आपली सर्च हिस्ट्री सिक्रेट ठेवतात?

खरचं Incognito mode सेफ आहे? ते आपली सर्च हिस्ट्री सिक्रेट ठेवतात?

सोर्स : गुगल

सोर्स : गुगल

पण आता प्रश्न असा उपस्थीत होतो की हा मोड सुरक्षित आहे का? आपण जे शोधतो, ते खरंच कोणा तिसऱ्या व्यक्तीला कळत नाही?

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई : सध्याचा काळ हा इंटरनेटचा आहे. त्यामुळे क्वचितच कोणी असं असेल की ज्याच्याकडे इंटरनेट नाही. कोणतीही माहिती मिळवायची असेल तर लोक पहिलं गुगल करतात. एवढंच काय तर आपल्या रोजच्या आयुष्यातील अनेक गोष्टी या इंटरनेट आणि गुगलवर अवलंबून आहेत.

बरेच लोक आपण काय सर्च करतो याची हिस्ट्री कोणाला माहित नको पडायला म्हणून इन्कॉग्निटो मोडमध्ये सर्च करतात. अनेकांना इन्कॉग्निटो मोडबद्दल फारशी माहिती नसेल. पण इथे सर्च केलेल्या गोष्टीची हिस्ट्री राहात नाही म्हणून लोक येथे सर्च करतात. हा पर्याय तुम्हाला गुगलमध्येच मिळेल.

प्रवाशांनी भरलेली ट्रेन बोगद्यात शिरताच गायब, याचं गुढं आजपर्यंत उलगडलं नाही

कोपऱ्यातील तिन डॉट असलेल्या ठिकाणी तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला तिथे New Incognito Tab हा पर्याय दिसेल. हे जवळपास सगळ्याच ब्राऊजरमध्ये आढळते.

पण आता प्रश्न असा उपस्थीत होतो की हा मोड सुरक्षित आहे का? आपण जे शोधतो, ते खरंच कोणा तिसऱ्या व्यक्तीला कळत नाही?

चला Incognitoमोड म्हणजे काय? ते का वापरले जाते, तसेच ते सुरक्षित आहे की नाही? हे समजून घेऊ

Incognito मोड म्हणजे काय?

बहुतेक वेब ब्राउझर तुम्ही काहीही सर्च केलं तरी त्यांची नोंद ठेवतात. हे कुकीजच्या रुपात होतं. ज्यामुळे तुम्ही सर्च केलेल्या साईट्स आणि माहिती पुन्हा मिळवू शकता.

आता प्रश्न असा उपस्थीत होतो की Incognito मोड वापरणे सुरक्षित आहे का?

Incognito मोड वापरणे सुरक्षित असू शकते, परंतु ते पूर्णपणे खाजगी नाही. हे खरे आहे की तुमचे डिव्हाइस कोणी हातात घेतला तर तुमची हिस्ट्री कोणीही पाहू शकणार नाही, पण असं असलं तरीही अनेक लोक तुमची ब्राउझिंग त्यांना आवश्यक असल्यास पाहू शकतात.

तुम्ही वापरत असलेली बहुतेक सर्च इंजिने तुमच्या सर्चची नोंद ठेवू शकतात, तुम्ही हे सर्च करण्यासाठी शाळा किंवा कोणाचं खाजगी नेटवर्क वापरले असल्यास, आयटी विभाग तुमचे हे सर्च पाहू शकतात.

हे लोक उपक्रमावर लक्ष ठेवतात

तुमचा ब्रॉडबँड प्रदाता तुम्ही ऑनलाइन काय करता याचे रेकॉर्ड देखील ठेवते. तुमच्यावर चित्रपटांचे ऑनलाइन पायरेटिंग केल्याचा आरोप लागला तर, मूव्ही स्टुडिओ किंवा वितरक तुमच्या ब्रॉडबँड प्रदात्यामार्फत तुमच्याकडून नुकसान वसूल करण्यासाठी कायदेशीर कारवाई करू शकतात.

First published:
top videos

    Tags: Google, Research, Shocking, Social media, Tech news, Top trending