मुंबई : आपलं जग हे खूप साऱ्या रहस्यांनी भरलेलं आहे. अशा अनेक गोष्टी आपल्या आजूबाजूला घडत असतात, ज्यावर विश्वास ठेवणं देखील आपल्याला कठीण होतं. पण त्या फारच रहस्यमयी असतात. कधी आकाशात उडणारे विमान गायब होते, तर कधी समुद्राच्या लाटांवर तरंगणारे संपूर्ण जहाज बेपत्ता होते. बर्म्युडा ट्रँगलबद्दल देखील तुम्ही ऐकलं असेल.
असंच एक प्रकरण समोर आलं आहे, ज्यामध्ये एक ट्रेन बोगद्यात गेली आणि गायब झाली. 1911 मध्ये कर्मचार्यांसह 106 प्रवाशांसह धावलेली ट्रेन आजपर्यंत आपल्या गंतव्यस्थानी पोहोचलेलीच नाही. ही संपूर्ण ट्रेन कुठे गेली हे कोणालाच कळू शकले नाही.
फक्त मच्छर चावल्यामुळे महिलेची झाली अशी अवस्था, अखेर कापावे लागले हातपाय
ट्रेनमध्ये असलेल्या 104 जणांचे काय झाले? याचा थांग पत्ता आजही कोणाली नाही.
नक्की काय घडलं होतं?
1911 मध्ये इटलीमध्ये एक ट्रेन रहस्यमयरीत्या गायब झाली होती. नवीन ट्रेनची रचना इटालियन कोच आणि इंजिन निर्माता झानेट्टी यांनी केली आहे. ट्रेनच्या ट्रायलसाठी कंपनीने लोकांना मोफत प्रवासासाठी आमंत्रित केले होते. त्यासाठी वर्तमानपत्रात जाहिराती दिल्या होत्या. ट्रायलसाठी रेल्वे कर्मचाऱ्यांसह 106 लोक ट्रेनमध्ये चढले होते.
काही मिनिटांतच ट्रेनने वेग पकडला. या प्रवासादरम्यान एका बोगद्यातून ट्रेन जाणार होती. ट्रेन बोगद्यात तर शिरली, पण त्यातून बाहेर आली नाही. काही प्रवासी प्रवासी पुढच्या स्टेशनवर ट्रेनची वाट पाहात थांबले होते, पण त्यावेळी ट्रेन आली नाही. जेव्हा ही ट्रेन आली तेव्हा ट्रेनची माहिती घेण्यात आली, पण ट्रेन कधी तिच्या पुढच्या स्टेशनवर पोहोचली नाही किंवा त्या ट्रेनचे कोणतेही पार्ट किंवा काहीही गोष्ट कोणाच्याही हाती लागले नाही. यानंतर लोकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
या घटनेत फक्त दोन जण वाचले. बोगद्यातून सुटलेले दोन्ही प्रवासी स्पष्टपणे काहीही सांगण्याच्या मनस्थितीत नव्हते. एकाने याबद्दल कधीही काहीही सांगितले नाही, तर दुसर्या प्रवाशाने लोकांना सांगितले की जेव्हा ट्रेन बोगद्यात प्रवेश करत होती तेव्हा त्यांना पांढरा धूर दिसला. घाबरून त्याने चालत्या ट्रेनमधून उडी मारली.
या घटनेची सत्यता आजतागायत शास्त्रज्ञ आणि तज्ज्ञांना शोधता आलेली नाही. याबद्दल वेगवेगळ्या गोष्टी समोर आल्या. काही वर्षांनंतर, ट्रेनचा काही भाग जर्मनी आणि रशियामध्ये सापडल्याचा दावा करण्यात आला होता, परंतु यासाठी कोणतेही ठोस पुरावे नाहीत.
ट्रेन मेक्सिकोला पोहोचली?
ही ट्रेन मेक्सिकोला पोहोचल्याचा दावा काही मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे. तिथल्या एका डॉक्टरने दावा केला होता की त्यांच्या हॉस्पिटलमध्ये 104 लोकांना दाखल करण्यात आले होते. सर्व लोक ट्रेनने हॉस्पिटलमध्ये पोहोचले होते, पण कोणाचीही प्रकृती बरी नव्हती.
या ट्रेनमधील सगळेच लोक वेडे झाले होते. काही लोकांनी बेपत्ता ट्रेन पाहिल्याचा दावा केला आहे. मात्र, आजपर्यंत त्याबाबत कोणतीही प्रमाणित माहिती मिळालेली नाही. लोक तिला भूत ट्रेन म्हणतात. सत्य हे आहे की हे रहस्य अद्याप उलगडलेले नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Shocking, Social media, Top trending, Train, Viral