मराठी बातम्या /बातम्या /Viral /

जाड कंबर.. भरा टॅक्स, सावली पडली.. भरा टॅक्स; कशावरही टॅक्स लावणारे चित्रविचित्र देश

जाड कंबर.. भरा टॅक्स, सावली पडली.. भरा टॅक्स; कशावरही टॅक्स लावणारे चित्रविचित्र देश

जगातील काही देशांमध्ये मात्र अगदी विचित्र गोष्टींवरही टॅक्स लावला जातो. अशाच काही अगदी विचित्र गोष्टींवर टॅक्स लावणाऱ्या देशांबद्दल आम्ही आता तुम्हाला सांगणार आहोत.

जगातील काही देशांमध्ये मात्र अगदी विचित्र गोष्टींवरही टॅक्स लावला जातो. अशाच काही अगदी विचित्र गोष्टींवर टॅक्स लावणाऱ्या देशांबद्दल आम्ही आता तुम्हाला सांगणार आहोत.

जगातील काही देशांमध्ये मात्र अगदी विचित्र गोष्टींवरही टॅक्स लावला जातो. अशाच काही अगदी विचित्र गोष्टींवर टॅक्स लावणाऱ्या देशांबद्दल आम्ही आता तुम्हाला सांगणार आहोत.

मुंबई, 9 जून : जगभरातील बहुतेक देश आपल्या नागरिकांकडून टॅक्स म्हणजेच कर (Tax) घेतात. या करातून मिळणाऱ्या उत्पन्नातून देशातील विविध कामं केली जातात. भारतातही रस्ते बांधणी, देखभालीपासून अनेक महत्त्वाच्या गोष्टींच्या वापरावर टॅक्स लावला जातो. रस्ते,पाणी,घरं इत्यांदींवर टॅक्स लावणं हे सर्वसाधारण आहे; पण जगातील काही देशांमध्ये मात्र अगदी विचित्र गोष्टींवरही टॅक्स लावला जातो. अशाच काही अगदी विचित्र गोष्टींवर टॅक्स लावणाऱ्या देशांबद्दल आम्ही आता तुम्हाला सांगणार आहोत. जाड कंबरेवर टॅक्स (Tax On Overweight Waist)- आश्चर्य वाटेल, पण एका देशात जर ठरलेल्या प्रमाणापेक्षा जास्त मापाची कंबर असेल तर त्यावर नागरिकांना टॅक्स द्यावा लागतो. या देशाचं नाव आहे जपान (Japan). याबद्दल न्यूयॉर्क टाईम्समध्ये एक वृत्त देण्यात आलं आहे. जपानमध्ये मोटाबो कायदा आहे, असं या वृत्तात म्हटलं आहे. या कायद्यानुसार 45 ते 75 वर्ष वयाच्या लोकांची कंबर ठराविक कालमर्यादेनुसार मोजली जाते. जर ठरलेल्या मापापेक्षा या कंबरेचं माप जास्त असेल तर त्यासाठी टॅक्स भरावा लागतो. लठ्ठपणावर नियंत्रण ठेवण्यासाठी हा टॅक्स लावला जात असल्याचं सांगितलं जातं. OMG! साडी नेसून मुंबईच्या मुलीने रस्त्यावर असं काही केलं की; तुफान व्हायरल होतोय हा VIDEO टॅटूवर टॅक्स (Tax On Tattoo) - अमेरिकेतील ऑर्कन्समध्ये शरीरावर कोणत्याही प्रकारचा टॅटू काढला तरी टॅक्स भरावा लागतो. टॅटू काढलेल्या व्यक्तीला सामान्य नागरिकांपेक्षा सहापट जास्त टॅक्स भरावा लागतो. सावलीवर टॅक्स (Tax On Shadow) - हे तर आणखीनच आश्चर्यकारक आहे, पण सत्य आहे. इटलीच्या व्हेनेटो शहरात कोणत्याही दुकान किंवा रेस्टॉरंटच्या बोर्डाची किंवा त्यांच्या शेडची सावली रस्त्यावर पडली तर त्यांना टॅक्स भरावा लागतो. या रेस्टॉरंट किंवा दुकानाच्या मालकाला वर्षातून एकदा टॅक्स भरावा लागतो. पॅनकार्डच्या मदतीने TDS Status चेक करा; पगारातून कापलेले पैसे रिफंड मिळण्यास होईल मदत उन्हावर टॅक्स (Tax On Sunrays) - स्पेनच्या बेलरिक आयर्लंडमध्ये 2016 मध्ये उन्हावर टॅक्स लागू करण्यात आला आहे. इथं अचानक पर्यटकांची संख्या वाढल्याने हा निर्णय घेण्यात आला. पर्यटकांची संख्या जास्त असल्याने स्थानिक व्यवस्थेवर ताण पडतो. या नुकसानाची भरपाई करण्यासाठी हा टॅक्स लावणं सुरू करण्यात आल्याचं सांगण्यात येतं. टॅनिंग टॅक्स (Tanning Tax) - अमेरिकेत 2020 पासून टॅनिंग टॅक्स लावला जातो. पाश्चात्य देशांत टॅनिंगची खूप क्रेझ आहे. या टॅनिंगमुळे स्कीन कॅन्सर म्हणजेच त्वचेच्या कर्करोगाच्या रुग्णांची संख्या वाढली, असं मानण्यात येतं. टॅनिंगची क्रेझ रोखण्यासाठीच हा टॅक्स लावायला सुरुवात झाली. तेव्हा या कोणत्याही देशात कधी गेलात तर वर सांगितलेले टॅक्स भरावे लागू शकतात, हे विसरु नका.
First published:

Tags: America, Money, Tax

पुढील बातम्या