तिरुवनंतपुरम, 08 जून : साडीत महिला जितक्या सुंदर दिसतात तितकीच ती त्यांच्यासाठी सांभाळणंही बऱ्याचदा कठीण होतं. काही महिलांना तर साडी नेसून चालणं, उठणं, बसणंही शक्य होत नाही. पण एका मुंबईकर मुलीने साडी नेसून रस्त्यात असं करतब करून दाखवलं आहे की, सर्वांनी तोंडात बोटं घातली आहेत. या तरुणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे (Mumbai girl in saree video). मुंबईच्या या मुलीने साऊथ इंडियन साडी नेसली आहे. जी पांढऱ्या रंगाची असते आणि त्याला सोनेरी काठ असते. तिने आपल्या केसांचा बन बांधून गजराही घातला आहे. एका रस्त्यावर ही तरुणी उभी दिसते. व्हिडीओच्या सुरुवातीला ती आपले दोन्ही हात जोडून नमस्कार करते. त्यानंतर ती पुढे जे करते ते थक्क करणारं आहे (Girl skating in saree video). व्हिडीओत तुम्ही पाहाल ही तरुणी चक्क साडी नेसून स्केटबोर्डवर उभी आहे. स्केटबोर्डिंग करण्यासाठी सेफ्टी गिअर्सची गरज असते. स्केटिंग करताना सुरक्षेची पुरेपूर काळजी घ्यावी लागते. कारण हे जितकं मजेशीर वाटतं तितकंच धोकादायकही आहे. थोडा जरी बॅलेन्स बिघडला तरी गंभीर दुखात होऊ शकते. पण ही तरुणी कोणत्याही सुरक्षेशिवाय साडी नेसून ती स्केटबोर्डवर चढली आहे. हेल्मेट आणि सेफ्टीगिअर्सऐवजी ती साडी नेसली आहे.पायात फक्त बूट घातले आहेत. पण तरी ती जबरदस्त स्केटिंग करताना दिसत आहे. अगदी आरामात ती राइड करते आहे. हे वाचा - डोक्यावर फेटा, हाती झेंडा; ‘जय शिवाजी’, ‘हरहर महादेव’ म्हणत कोल्हापूरच्या 80 वर्षांच्या आजीने सर केला रायगड किल्ला आपले दोन्ही हात जोडत नमस्कार करत ती स्केटिंगला सुरुवात करते. त्यानंतर आपल्या हातावरील पदर हवेत उडवत रस्त्यावर ती स्केटिंगबोर्डवर सुसाट सुटते. तिच्या चेहऱ्यावर उत्साह आणि आनंदही झळकताना दिसतो आहे.
या तरुणीचं नाव लॅरिसा असं आहे. जी मुंबईत राहणारी आहे. तिला फिरायला खूप आवडतं. तिने केरळच्या रस्त्यावर हे स्केटिंग केलं आहे. लॅरिसाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. पोस्टमध्ये ती म्हणाली, केरळच्या रस्त्यावर जेव्हा मी असं करत होती तेव्हा बरेच लोक मला पाहून थक्क झाले. काहींनी माझ्यासोबत सेल्फीही घेतला. साडी नेसून स्केटबोर्ड करणं सोपं नव्हतं हेसुद्धा तिने सांगितलं आहे. हे वाचा - रेस जिंकल्याच्या उत्साहात सायकलिस्टकडून घडलं भयंकर कृत्य; थेट रुग्णालयात पोहोचली बायको अनेकांना साडी नेसून नीट चालायला, उठायला, बसायलाही जमत नाही. असं असताना लॅरिसाने साडी नेसून स्केटिंग केलं म्हणजे नक्कीच कौतुकास्पद आहे. व्हिडीओ पाहून सर्वजण थक्क झाले आहेत. लॅरिसाच्या टॅलेंटचं कौतुक करत आहेत.

)







