Home /News /money /

पॅनकार्डच्या मदतीने TDS Status चेक करा; पगारातून कापलेले पैसे रिफंड मिळण्यास होईल मदत

पॅनकार्डच्या मदतीने TDS Status चेक करा; पगारातून कापलेले पैसे रिफंड मिळण्यास होईल मदत

टीडीएस स्थिती तपासत (TDS Status Check) राहणे फार महत्वाचे आहे. यावरून तुमचा एकूण किती कर कापला गेला आहे याची कल्पना येतो. यासोबतच, इन्कम रिटर्न भरताना तुम्ही तुमची कर कपातीची स्थिती देखील तपासू शकता.

    मुंबई, 9 जून : नोकरी करणाऱ्यांच्या पगाराचा काही भाग टीडीएस (TDS) म्हणून कापला जातो. परंतु, जर तुमचा पगार टॅक्स स्लॅबपेक्षा (Tax Slab) कमी असेल, तर अशा परिस्थितीत तुम्ही टीडीएससाठी क्लेम करू शकता. जेव्हाही हा TDS कापला जातो तेव्हा तो तुमच्या पर्मनंट अकाऊंट नंबरवर (PAN) जमा केला जातो. अनेक वेळा लोक वेगवेगळ्या प्रकारच्या व्यवसायात किंवा कामात पैसे गुंतवतात. अशा परिस्थितीत त्यांच्याकडे उत्पन्नाचे अनेक स्त्रोत आहेत. अशा स्थितीत हे सर्व कर कापून पॅन नंबरमध्ये जमा केले जातात. म्हणूनच वेळोवेळी तुमची टीडीएस स्थिती तपासत (TDS Status Check) राहणे फार महत्वाचे आहे. यावरून तुमचा एकूण किती कर कापला गेला आहे याची कल्पना येतो. यासोबतच, इन्कम रिटर्न भरताना तुम्ही तुमची कर कपातीची स्थिती देखील तपासू शकता. तुम्ही देखील TDS स्टेटस तपासू शकता. Bank Strike: बँकेची कामं आधीच करुन घ्या; कर्माचारी 'या' दिवशी जाणार संपावर अशा प्रकारे पॅन नंबरद्वारे टीडीएस स्टेटस तपासा >> अधिकृत वेबसाइट www.tdscpc.gov.in/app/tapn/tdstcscredit.xhtml लिंकवर क्लिक करा. >> येथे तुम्हाला एक व्हेरिफिकेशन कोड बॉक्स दिसेल जेथे तुम्हाला रेड कोड एंटर करावा लागेल. 3. पुढे Proceed च्या पर्यायावर क्लिक करा. 4. यानंतर तुम्ही PAN आणि TAN क्रमांक टाका. 5. यानंतर आर्थिक वर्ष आणि परताव्याचा प्रकार निवडा. 6. यानंतर Go पर्यायावर क्लिक करा. 7. यानंतर, तुमच्या TDS चे संपूर्ण तपशील तुमच्या समोर दाखवले जातील. Post Office Schemes: पैसे बुडण्याची भीती नाही आणि बँकेपेक्षा जास्त व्याज; गुंतवणूकदारांना फायदा अशा प्रकारे TDS रक्कम परत केली जाईल? तुम्ही वेळोवेळी टीडीएस तपासत राहिल्यास, तुम्ही आयकर रिटर्न भरून रकमेचा दावा करू शकता. जर तुमचे उत्पन्न टॅक्स स्लॅबच्या आत असेल तर तुम्हाला पूर्ण परतावा मिळेल.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Income tax, Money, Pan card

    पुढील बातम्या