सांगली 27 जुलै: राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये मागील काही दिवसांपासून मुसळधार पावसानं (Heavy rain in Maharashtra) हजेरी लावली. यामुळे बऱ्याच ठिकाणी महापुरही आला. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांनाही (Flood in Kolhapur and Sangli) याचा मोठा फटका बसला. सांगलीतून पुराचे अनेक व्हिडिओ आणि फोटो समोर आले. मात्र, आता समोर आलेला व्हिडिओ (Video) जरा हटके आहे. कारण या व्हिडिओमध्ये (Wedding Video) पुराच्या पाण्यातून चक्क लग्नाची वरात चालल्याचं पाहायला मिळतं. प्राणी-पक्षी पाळणाऱ्यांसाठी एक कटू सत्य; IFS अधिकाऱ्यांनी VIDEO केला शेअर सांगली जिल्ह्यात महापूर आला आहे. अनेक रस्ते बंद आहेत. मात्र एका तरुणानं या पुराच्या कठीण काळात लग्न केलं इतकंच नाही तर पुराच्या पाण्यातून बोटीमधून त्यानं आपली वरात काढली. सांगलीच्या मारुती चौकात छाती एवढे पाणी आहे. घर तर पाण्यात बुडालं आहे. मग आपल्या नवरीला घरात घेऊन जायचं कसं? असा प्रश्न या तरुणासमोर उभा राहिला. मग या तरुणानं शक्कल लढवली. त्यानं एक बोट मागवून घेतली आणी बोटीतून आपली वरात काढत नवरीला घरी आणलं.
सांगलीकरांनी पुराच्या पाण्यातून काढली वरात pic.twitter.com/lY22EbjFiL
— News18Lokmat (@News18lokmat) July 27, 2021
सांगलीत पुराच्या पाण्यातून निघाली वरात pic.twitter.com/K5Q6OYrPUu
— News18Lokmat (@News18lokmat) July 27, 2021
भयंकर! ट्रेनमध्येच महिलेचं धक्कादायक कृत्य; VIDEO पाहून चक्रावून जाल या घटनेचा व्हिडिओ कोणीतरी शूट केला. सध्या केवळ सांगलीत नाही तर राज्यभर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर (Social Media) नेटकरी या व्हिडिओवर निरनिराळ्या प्रतिक्रिया देत आहेत. बऱ्याच लग्नातील मजेशीर आणि मस्तीचे व्हिडिओ तुम्ही आजपर्यंत पाहिले असतील , मात्र हा आगळावेगळा व्हिडिओ तुमच्याही नक्कीच पसंतीस उतरेल, यात काही शंका नाही.