• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • प्राणी-पक्षी घरात पाळणाऱ्यांसाठी एक कटू सत्य; IFS अधिकाऱ्यांनी VIDEO शेअर करून केलं आवाहन

प्राणी-पक्षी घरात पाळणाऱ्यांसाठी एक कटू सत्य; IFS अधिकाऱ्यांनी VIDEO शेअर करून केलं आवाहन

याला नेटिझन्सकडून जोरदार प्रतिसाद मिळत असून, अनेकांनी अशीच स्थिती दर्शवणारे फोटो, व्हिडीओ कमेंट सेक्शनमध्ये शेअर केले आहेत.

 • Share this:
  नवी दिल्ली, 26 जुलै : आपल्यापैकी अनेकांना प्राणी (Animal), पक्षी (Bird) पाळण्याची विशेष आवड असते. काही जणांना प्राणी, पक्ष्यांविषयी विलक्षण जिव्हाळा असतो. त्यामुळे कुत्रा, मांजर, पोपट आदी पाळीव प्राणी आणि पक्षी कुटुंबातील एक सदस्य बनून जातात. काही लोक कोणतीही माहिती न घेता, शहानिशा न करता केवळ प्रेमापोटी पालनाकरिता प्राणी, पक्षी घरी घेऊन येतात. या निष्पाप प्राणी, पक्ष्यांची विक्री करण्यापूर्वी त्यांना कशा अवस्थेत ठेवलं जातं याविषयी अनेक जण अनभिज्ञ असतात. अनेकदा अशा निष्पाप पक्ष्यांची तस्करी (Smuggling) देखील केली जाते. काही पक्ष्यांची विक्री तर खाण्यासाठीदेखील केली जाते. याबाबत वास्तव दर्शवणारा एक व्हिडिओ आणि पोस्ट सध्या सोशल मीडियावर (Social Media) जोरदार व्हायरल (Viral) होत आहे. एका आयएफएस ऑफिसरने हा व्हिडीओ आणि पोस्ट शेअर केली असून, त्यातील व्हिडीओत पोपटांना पिंजऱ्यातून मोकळं सोडलं जातयं तर पोस्टमध्ये या पोपटांना (Parrot) अत्यंत निर्दयपणे पिंजऱ्यात डांबण्यात आल्याचं दाखवलं गेलय. असे पक्षी खरेदी करु नका असे अपील या अधिकाऱ्याने या पोस्टच्या माध्यमातून केलं आहे. याला नेटिझन्सकडून जोरदार प्रतिसाद मिळत असून, अनेकांनी अशीच स्थिती दर्शवणारे फोटो, व्हिडीओ कमेंट सेक्शनमध्ये शेअर केले आहेत. वास्तविक पाहता अनेक पोपटांना पिंजऱ्यातून मोकळे सोडत असल्याचा एक व्हिडीओ आयएफएस ऑफिसर परवीन कासवान (IFS Officer Parveen Kaswan) यांनी त्यांच्या आधिकृत व्टिटर (Twitter) हँडलवरुन नुकताच शेअर केला आहे. स्वातंत्र्य असं दिसतं, अशी कॅप्शन कासवान यांनी या व्हिडीओत लिहीली आहे. या सर्व पक्ष्यांची तस्करी केली जात होती. परंतु आमच्या म्हणजे वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी या पक्ष्यांना रेस्क्यू (Rescue) करत पिंजऱ्यातून मोकळे केल्याची माहिती कासवान यांनी दिली आहे. हे ही वाचा-Video: 10 वर्षांच्या मुलीला वाचवण्यासाठी लहान कुत्र्यानं लावली जीवाची बाजी हा व्हिडीओ लाखो लोकांनी पाहिला आहे. हा व्हायरल व्हिडीओ पाहून लोक या पक्ष्यांना मोकळं सोडून दिल्याबद्दल संबंधित कर्मचाऱ्यांचे कौतुक करत आहेत. अनेक लोक कमेंटमध्ये अशा प्रकारचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत आहेत. याच संदर्भात या अधिकाऱ्याने अजून एक पोस्ट केली आहे. यात अनेक पोपटांना अत्यंत वाईट पध्दतीने एका पिंजऱ्यात बंद करुन ठेवल्याचं दिसत आहे. या पोस्टच्या कॅप्शन (Caption) मध्ये, स्थानिक बाजारातून तुम्ही जे पक्षी खऱेदी करता, या पध्दतीने त्यांची तस्करी केली जाते. त्यांना पकडून पिंजऱ्यात डांबून ठेवलं जातं. त्रास दिला जातो. त्यामुळे हे पक्षी खरेदी करु नका, असं लिहिलं आहे.
  First published: