तुम्ही रस्त्यात उभं राहून सेल्फी काढता का? हा VIRAL VIDEO आधी पाहाच

तुम्ही रस्त्यात उभं राहून सेल्फी काढता का? हा VIRAL VIDEO आधी पाहाच

सोशल मीडियावर सेल्फी घेणाऱ्या मुलींचा एक VIDEO VIRAL झाला आहे. मोबाईल उंच धरत भर रस्त्याच्या कडेला उभं राहून या दोघी सेल्फी घेताना दिसतात. पुढे काय होतं ते या व्हिडिओतच पाहा...

  • Share this:

मुंबई : सेल्फीचं वेड कुणालाही असू शकतं. त्याला हल्ली वयाचंही बंधन राहिलेलं नाही. पण आपण कुठे उभं राहून सेल्फी काढतोय आणि त्याचा काय परिणाम काय होऊ शकतो याचा विचार केला नाही, तर मात्र ही सेल्फी अंगाशी येऊ शकते. सोशल मीडियावर सेल्फी घेणाऱ्या मुलींचा एक VIDEO VIRAL झाला आहे. भर रस्त्यात कडेला उभं राहून या मुली सेल्फी घेताना दिसत आहेत. हा व्हिडिओ नेमका कुठल्या शहराचा याचा उलगडा होत नाही, पण भारतीय शहर आहे हे नक्की. YouTube पासून Twitter पर्यंत अनेक माध्यमांवर हा व्हिडिओ पोस्ट झालेला आहे. साडी आणि ठेवणीतले कपडे घातलेल्या दोघी जणी रस्त्याकडेला उभं राहून मोबाईल उंच धरत सेल्फी घेताना दिसतात. पुढे काय होतं ते या व्हिडिओतच पाहा...

मुली सेल्फी घेत असताना वाहत्या रस्त्यावरून गाड्या, दुचाकी जाताना दिसतात. सायकलरिक्षाही जाते, त्यावरून हे शहर उत्तर भारतातलं असावं असं वाटतं. पण नंतर काय झालं पाहा...

सेल्फी घेण्यात दंग असणाऱ्या या मुलींच्या हातातला मोबाईल एक स्कूटरस्वार अलगद उचलून फरार होतो. अचानक झालेल्या या प्रकाराने गोंधळलेल्या मुली आरडाओरडा करताना दिसतात. पण स्कूटरस्वार चोर सापडतो की नाही हे या व्हिडिओतून स्पष्ट होत नाही.

हा व्हिडिओ पाहून सेल्फीवेडाला थोडा आळा घालायला हवा, हे नेमकं कळेल. किमान आपण रस्त्यात उभं राहून इतक्या गाफिलपणाने फोटो काढू नयेत नाहीतर हातातला मोबाईल कधी पळवला जाईल सांगता येत नाही.

------------

अन्य बातम्या

शिक्षिकेनं असा शिकवला 9चा पाढा की शाहरुखही झाला फॅन! VIDEO VIRAL

‘रंगील’ सरपंचाचा बारबालांसोबत अश्लील डान्स, निवडणूक जिंकताच केला हवेत गोळीबार

LIVE सामन्यातच कपलचा सुरू झाला रोमान्स, आधी केलं KISS आणि...

First published: January 23, 2020, 6:29 PM IST

ताज्या बातम्या