Home /News /viral /

शिक्षिकेनं असा शिकवला 9चा पाढा की शाहरुखही झाला फॅन! VIDEO पाहून तुमचीही गणिताची भीती उडेल

शिक्षिकेनं असा शिकवला 9चा पाढा की शाहरुखही झाला फॅन! VIDEO पाहून तुमचीही गणिताची भीती उडेल

तुम्हाला किंवा तुमच्या मुलांना गणिताची भिती वाटत असेल, तर हा VIDEO नक्की बघा

    बिहार, 23 जानेवारी : लहाणपणी सगळ्यांना शाळेत गणिताची भिती असते. हा एकच विषय असतो, जो मुलांना सहसा आवडत नाही. मात्र सध्या सोशल मीडियावर गणिताची एक ट्रिक व्हायरल होत आहे. यामध्ये एक शिक्षिका हटके अंदाजाने पाढे शिकवत आहे. हा व्हिडीओ एवढा व्हायरल झाला आहे की चक्क आनंद महिंद्रा आणि किंग खान शाहरुख खान यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. आनंद महिंद्रा यांनी व्हॉट्सअप वंडर बॉक्स (Whatsapp Wonder Box) या हॅशटॅगसह हा व्हिडीओ शेअर का आहे. या व्हिडीओमध्ये शिक्षिका आपल्या विद्यार्थ्यांना नऊचा पाढा शिकवताना दिसत आहे. मात्र हा पाढा शिकवताना शिक्षिकेने एक भन्नाट आयडिया वापरली. या व्हिडिओमध्ये, शिक्षिकेने एका मुलीला उभे केले आणि हाताचा कॅल्क्युलेटर वापरून गुणाकार केला. असा गुणाकार तुम्ही कधीच पाहिला नसेल. वाचा-WhatsApp अपडेट! Dark Mode सुरू करण्यासाठी वापरा 'या' टिप्स हा व्हिडिओ अपलोड करताना आनंद महिंद्राने यांनी, 'काय? मला या शॉर्टकटबद्दल अजिबात माहिती नव्हती. माझी इच्छा आहे की ही माझी गणिताची शिक्षिका असावी. असे झाले असते तर मी गणितात नेहमी चांगले गुण मिळवले असते', असे कॅप्शन दिले आहे. वाचा-बॉसचा काटा काढण्यासाठी पठ्ठ्याने ऑफिसमध्ये पाठवला पार्सल बॉम्ब आणि... वाचा-‘रंगील’ सरपंचाचा बारबालांसोबत अश्लील डान्स, निवडणूक जिंकताच केला हवेत गोळीबार इतकेच नाही तर या शिक्षकांच्या शैलीने शाहरुख खान देखील खूप प्रभावित झाला आहे. त्यांनी व्हिडिओ रीट्वीट करत लिहिले की, या साध्या कल्पनेने माझ्या आयुष्यातील किती गणितांच्या समस्या सुटल्या आहेत’. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच पसंत केला जात आहे. व्हिडिओ आतापर्यंत सुमारे आठ हजार लोकांनी रीट्वीट केला आहे आणि सुमारे 29 हजार लोकांनी पसंत केला आहे आणि 52 हजारांहून अधिक वेळा पाहिला आहे.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    पुढील बातम्या