Home /News /national /

VIDEO : ‘रंगील’ सरपंचाचा बारबालांसोबत अश्लील डान्स, निवडणूक जिंकताच केला हवेत गोळीबार

VIDEO : ‘रंगील’ सरपंचाचा बारबालांसोबत अश्लील डान्स, निवडणूक जिंकताच केला हवेत गोळीबार

निवडणूक जिंकल्यानंतर सरपंचाने बारबालांवर पैसे उधळत केला अश्लील डान्स, VIDEO VIRAL.

    जयपूर, 23 जानेवारी : राजस्थानमध्ये सध्या पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणूक (Rajasthan Panchayat Election 2020) सुरू आहेत. यात मतदानाचा दुसरा टप्पा बुधवारी पार पडला. मात्र पहिल्या टप्प्यात सरपंच निवडणूक विजयी विजयानंतर एका सरपंचाच्या सेलिब्रेशनचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 17 जानेवारी रोजी झालेल्या पंचायत निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात विजयी उमेदवारांची नावे जाहीर होताच उत्सव सुरू झाला. अशाच एका सेलिब्रेशनमध्ये एक तरुणी कारवर चढून नाचताना दिसत आहे. यात तिच्याबरोबर एक तरुण हवेत गोळीबार करत डिस्को करताना दिसत आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. वाचा-लोकांना वाटलं पुन्हा नोटाबंदी म्हणून बॅंकाबाहेर पैसे काढण्यासाठी लावल्या रांगा वाचा-‘माझ्याकडे एवढा माल आहे की तुला...’, शोएब अख्तरची सेहवागवर खालच्या पातळीची टीका हा व्हिडिओ धौलपूर जिल्ह्यातील राजखेडा परिसरातील ग्रामपंचायत चौहान पुराचे रामसिंह पुराचा गावचा असल्याचे सांगितले जात आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये एक तरुण वाहनावर चढून गोळीबार करत नाचताना दिसत आहे. तर दुसरी व्यक्ती नर्तक मुलीवर नोटांचा वर्षाव करीत आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिस प्रशासनाने संबंधितांवर कारवाई केली आहे. व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या युवकाचा आता पोलिस शोध घेत आहेत. न्यूज 18 व्हिडिओ व्हायरल होत असल्याची पुष्टी करत नाही. वाचा-LIVE VIDEO: डोळ्यादेखत पत्त्यासारखी कोसळली हजारो लिटर पाण्याची टाकी वाचा-‘माझ्यावरही बलात्कार झाला होता’, 'अर्जुन रेड्डी'च्या अभिनेत्याचा धक्कादायक खुलास एका युवकाची ओळख पटली व्हायरल व्हिडीओत गोळीबार केलेल्या व्यक्तीची ओळख भोर तोमर येथील रहिवासी रामसिंग पुरा म्हणून झाली आहे. धौलपूर पोलिस ठाण्यात राहणारी भूरा तोमर आपल्या सरपंच उमेदवाराचा विजय साजरा करत असल्याचे सांगितले जात आहे.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Video viral

    पुढील बातम्या