मुंबई 4 डिसेंबर : रस्त्यावरुन चालताना किंवा गाडी चालवताना नेहमीच सतर्क राहाण्यासाठी सांगितले जाते. कारण कधी कोणत्या दिशेने मृत्यू कधी येऊन उभा राहिल याचा काही नेम नाही. या संदर्भात आपण अनेक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर समोर आले आहेत. जे फारच धक्कादायक असतात, काही व्हिडीओ तर इतके धोकादायक असतात की ते पाहून तुमच्या अंगावर काटा उभा राहिल. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. जो पाहून तुमच्या अंगावर काटा उभा राहिला. हा व्हायरल व्हिडीओ पाहून नेटकरी देखील घाबरले आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही ही गोष्ट नक्कीच मनाल की, मृत्यू कधी समोरून येईल याचा काही नेम नाही. हे ही पाहा : रस्ता अपघाताचा थरारक Video, डंपर चालकानं गाडीवरील तरुणीला चिरडलं हा व्हायरल व्हिडीओ रस्ते अपघाताचा आहे. यामध्ये हायवेवरुन गाड्या चालत असताना असं काही घडतं की ज्यामुळे लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहे. या व्हिडीओच्या सुरुवातीला गाड्या चालताना दिसत आहेत. तेवढ्यात समोरुन एक कार येते, जी एका कन्टेनरला क्रॉस करत दुसऱ्या बाजूला उलट्या दिशेने येते. कदाचित या कार चालकाचा कारवरील ताबा सुटला असावा. पण यामुळे ही कार समोरुन येत असलेल्या दुसऱ्या कारला जोरदार धडकते. हे सगळ पाहात कन्टेनर चालक ब्रेक लावतो. पण त्याचा परिणाम उलटात होतो. या कन्टेनरचा बॅलेंस जातो, ज्यामुळे तो थेट या दोन्ही गाड्यांवर पडतो. ज्यामुळे कारमधील लोकांना जागीच मृत्यू झाला आहे. हे ही वाचा : कारच्या साइड मिररसंदर्भात तुम्ही तर करत नाही ना ही चूक? ती आत्ताच बदला एका कारवाल्याच्या चुकीमुळे दुसऱ्या कार चालकाला आणि त्यामधील लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहे.
हा व्हिडीओ मागून येणाऱ्या कारच्या कॅमेरामध्ये कैद झाला. जो सोशल मीडियावर @ViciousVideos या अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे.
हा व्हिडीओ पाहून नेटकरी घाबरले आहेत. तसेच लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देखील या व्हिडीओवर दिल्या आहेत. हा व्हिडीओ पाहून तुमच्या लक्षात येईल की कधी कधी दुसऱ्याच्या चुकीमुळे देखील अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहे.